By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:43 IST
1 / 9पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शांत झाली. निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉल खेळताना दिसले.2 / 9पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये दाखल झाले. दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी गंगटोकच्या तरुणाईमध्ये फुटबॉलचा आनंद घेताना दिसले.3 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले आणि त्यांनी तरुणांसोबत फुटबॉल खेळले. फुटबॉलच्या मैदानातील फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले.4 / 9त्यांनी लिहिले, 'गंगटोकच्या सुंदर सकाळी सिक्कीममधील माझ्या तरुण मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखे दुसरे काही असूच शकत नाही.'5 / 9या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच पंतप्रधान मोदींनी तरुणांशी संवाद साधला.6 / 9तरूणाईसोबत फुटबॉल खेळणे आणि त्याचे फोटो शेअर करणे ही पश्चिम बंगालला आकर्षित करण्याची एक रणनीती म्हणूनही पाहिली जात आहे.7 / 9पश्चिम बंगाल तसेच सिक्कीममध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे भारतातील क्लब फुटबॉलचे एक प्रमुख केंद्र आहे. 8 / 9गावपातळीवरही फुटबॉल क्लब अस्तित्वात आहेत. पश्चिम बंगालमधील फुटबॉलची लोकप्रियता इतकी आहे की विश्वचषकावेळी रस्तेवाहतूक ठप्प होते.9 / 9निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले, गोल केल्याचा आनंद साजरा केला आणि त्याचे फोटो शेअर केले.