मेघालयच्या शिलॉन्गमध्ये हनिमूनला गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सोनम रघुवंशीला अखेर न्यायालयाने दिलासा दिला आहे. २८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काही अटींसह तिचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे राजाच्या कुटुंबात मात्र संतापाची लाट उसळली आहे.
मे २०२५ मध्ये इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह झाला होता. हनिमूनसाठी ते मेघालयला गेले होते. २३ मे २०२५ रोजी राजा अचानक बेपत्ता झाला आणि काही दिवसांनी त्याचा मृतदेह दरीत सापडला. १० दिवसांच्या शोध मोहिमेनंतर, २ जून २०२५ रोजी राजाचा मृतदेह ३० फूट खोल दरीतून क्षत-विक्षत अवस्थेत सापडला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मदतीने आणि इंदूरहून गेलेल्या ३ भाडोत्री मारेकऱ्यांच्या सहाय्याने राजाच्या हत्येचा कट रचला होता. हे प्रकरण देशभर गाजले होते.
न्यायालयाच्या कडक अटीसोनमला जामीन मिळाला असला, तरी तिला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही. खटला सुरू असेपर्यंत सोनमला मेघालय किंवा शिलॉन्ग सोडून जाता येणार नाही. तिला दररोज स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुराव्यांशी किंवा साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधण्यास तिला सक्त मनाई करण्यात आली आहे.
सोनम गेल्या ११ महिन्यांपासून शिलॉन्ग येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होती. चौथी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिला ही सवलत दिली आहे.
राजाच्या कुटुंबाची नाराजी"माझ्या मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला इतक्या लवकर जामीन मिळणे हे दुर्दैवी आहे," अशी भावना राजाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. राजा रघुवंशी याचा भाऊ विपिन रघुवंशी याने सोनमच्या जामिनाची पुष्टी केली आहे. सोनमचा प्रियकर आणि या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी राज कुशवाहा हा अद्याप शिलॉन्ग तुरुंगातच बंद आहे.
Web Summary : Sonam Raghuvanshi, arrested in connection with her husband's murder in Meghalaya, has been granted bail with strict conditions. She cannot leave Meghalaya and must report daily to the local police. Her lover remains in custody. The victim's family expressed outrage.
Web Summary : मेघालय में पति की हत्या के आरोप में गिरफ्तार सोनम रघुवंशी को सख्त शर्तों के साथ जमानत मिली। वह मेघालय नहीं छोड़ सकती और उसे रोजाना स्थानीय पुलिस स्टेशन में रिपोर्ट करना होगा। उसका प्रेमी हिरासत में है। पीड़ित के परिवार ने आक्रोश व्यक्त किया।