शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:31 IST

धर्माची विचारपूस करून सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला; रक्ताळलेला घटनाक्रम समोर

Mira Road Stabbing: मीरा रोड येथील नया नगर भागात रविवारी पहाटे दोन सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील जखमी सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. धर्माची विचारपूस करून आणि कलमा येतो का म्हणत आरोपी जैब अंसारी याने हा हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

रात्री ३ वाजता सुरू झाले प्रकरण

सुब्रतो सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ च्या सुमारास ते कर्तव्यावर असताना एक जैब अंसारी त्यांच्या जवळ आला. त्याने सुरुवातीला विचारले, पुढे मशीद आहे का? सुब्रतो यांनी होकार दिल्यावर त्याने मशिदीचे नाव विचारले. नाव माहित नसल्याचे सांगताच आरोपीने थेट प्रश्न केला, तू हिंदू आहेस का? सुब्रतो यांनी हो म्हटल्यावर तो तरुण तिथून निघून गेला. पण नंतर तो त्याच परिसरातच फिरत होता.

पहाटे साडेचारला थेट वार

पहाटे ४ वाजता सुब्रतो चहा पिण्यासाठी रसाज सिनेमाजवळील इराणी हॉटेलवर गेले, तिथेही जैब अंसारी हजर होता. तिथून परत आल्यावर साडेचारच्या सुमारास आरोपीने सुब्रतो यांचा उजवा हात पकडला आणि तू हिंदू आहेस ना? असे ओरडून चाकूने वार केला. वार चुकवण्याचा प्रयत्न करताना चाकू त्यांच्या पाठीला लागला. जीवाच्या आकांताने सुब्रतो सुपरवायझरच्या केबिनकडे पळाले.

"कलमा वाच नाहीतर..." सुपरवायझरवरही हल्ला

सुब्रतो केबिनमध्ये पोहोचले आणि सुपरवायझर राजकेशर मिश्रा यांना घडलेला प्रकार सांगू लागला. इतक्यात आरोपी तिथेही पोहोचला. त्याने मिश्रा यांना धमकावत विचारले, तू पण हिंदू आहेस ना? नसेल तर कलमा वाच. मिश्रा यांना कलमा वाचता न आल्याने आरोपीने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मिश्रा यांच्या पोटात, पाठीत आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या.

"मी मरेन... मी मरेन..." रडत केला फोन

हल्ल्यानंतर सुब्रतो इमारतीच्या मागे लपून राहिले. काही मिनिटांनी त्यांनी घाबरतच सुपरवायझर मिश्रा यांना फोन केला. त्यावेळी मिश्रा रडत होते आणि "मी मरेन, मी आता वाचणार नाही" असे सांगत होते. सुब्रतो यांनी धाडस करून केबिन गाठले, तेव्हा आरोपी तिथून पसार झाला होता आणि मिश्रा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

आरोपी उच्चशिक्षित शिक्षक

तपासातून समोर आले आहे की, आरोपी जैब अंसारी हा उच्चशिक्षित असून त्याने अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. तो मुलांना गणित आणि रसायनशास्त्र शिकवत असे. मात्र, तो सातत्याने कट्टरपंथी व्हिडिओ पाहत असे. त्याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत लोन वुल्फ हल्ल्याचा उल्लेख असल्याने आता या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Road Attack: Accused asked if Hindu, then stabbed

Web Summary : In Mira Road, a man, Jaib Ansari, stabbed two security guards after asking if they were Hindu. One victim recounted the harrowing ordeal. Ansari, an educated tutor, is now under investigation by the ATS.
टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस