क्रिकेट जगतातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली सध्या IPL मध्ये व्यस्त आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची धावांची भूक कायम असल्याचं त्याने RCB कडून मैदानात उतरल्यावर पुन्हा सिद्ध केलं. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीनं जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये ९००० धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. मैदानावरील या विक्रमी कामगिरीची चर्चा रंगलेली असतानाच विराटचा मैदानाबाहेरील एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात तो शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना पाहायला मिळते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या दमदार विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं वेळात वेळ काढून नवी दिल्लीतील एका शाळेला भेट दिली. भाषणासाठी तो व्यासपीठावर आल्यावर जोरदार टाळ्यांच्या गजरात किंग कोहलीचं स्वागत करण्यात आले. त्याने भाषणाला सुरुवात केल्यावर कोहली नावाचा जयघोष सुरु होता. ते पाहून "बोलने तो दो यार..." असं म्हणत किंग कोहलीनं उत्साही विद्यार्थ्यांना शांत राहण्याची विनंती केल्याचे पाहायला मिळाले. त्याची हीच गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ध्येय प्राप्तीचा गुरु मंत्र
या कार्यक्रमात कोहलीने विद्यार्थ्यांना शालेय वातावरण आणि शिक्षकांचा आदर राखण्यासोबतच ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. आपल्या शालेय दिवसांची आठवण सांगत तो म्हणाला की, जेव्हा क्रिकेट हेच आपले खरे ध्येय आहे हे ठरवले, तेव्हा स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहाण्याचा प्रयत्न केला. ध्येय प्राप्तीसाठी प्राणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा सल्ला त्याने विद्यार्थ्यांना दिला.
IPL मध्ये यंग ब्रिगेडटला टक्कर देतोय अनुभवी विराट
विराट कोहली हा क्रिकेट जगतातील महान फलंदाज आहे. पण टी-२० क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटवरुन अनेकदा त्याच्या फंलदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात तो पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रभावि स्ट्राईक रेटसह आपल्या टीकाकारांना उत्तर देताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात ८ सामन्यात त्याने ३ अर्धशताकासह जवळपास १६२ च्या स्ट्राईक रेटनं ३५१ धावा केल्या आहेत.
Web Summary : Virat Kohli, amidst IPL, visited a Delhi school, urging students to respect teachers and focus on goals. He shared his dedication to cricket and emphasized honest effort for success, showcasing his impactful presence beyond the field.
Web Summary : आईपीएल के बीच विराट कोहली दिल्ली के एक स्कूल गए, जहाँ उन्होंने छात्रों से शिक्षकों का सम्मान करने और लक्ष्यों पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया। उन्होंने क्रिकेट के प्रति अपना समर्पण साझा किया और सफलता के लिए ईमानदार प्रयास पर जोर दिया।