LNG Tanker Ship News: युद्धविराम लागू असला तरी अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम आहे. शांततेच्या काळात जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस व्यापार या मार्गाने होतो. अमेरिकेची नाकेबंदी इराणला तेल विक्रीपासून रोखण्यासाठी असून, त्यामुळे त्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. सामुद्रधुनी बंद असल्याने आखातातील अनेक टँकर अडकून पडले आहेत, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यातच सुमारे महिनाभर गायब असलेले LNG टँकर जहार अचानक भारताजवळ दिसले आहे.
इराणच्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा खार्ग बेटावरून येतो. येथे सुमारे ३ कोटी बॅरल साठवणूक क्षमता असून ती जवळपास पूर्ण भरली आहे. सध्या फक्त १.३ कोटी बॅरल जागा उरली असून, दररोज १० ते ११ लाख बॅरल तेल जमा होत आहे. या गतीने पुढील १२ ते १३ दिवसांत साठवणूक पूर्ण भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १६ एप्रिलच्या उपग्रह चित्रांनुसार, खार्ग टर्मिनलवर तीन टँकरमध्ये एकूण ५० लाख बॅरल तेल लोड करण्यात आले होते. अतिरिक्त साठ्यासाठी इराणने ३० वर्षे जुना 'नाशा' टँकर पुन्हा वापरात आणला आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारा हा पहिला मालवाहू LNG टँकर ठरेल
काही रिपोर्टनुसार, काही तेल आणि एलपीजी टँकर्सनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे, मात्र, आता असे वृत्त आहे की, एका एलएनजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली असून तो आता भारताजवळ दिसत आहे. जहाज ट्रेकिंग डेटानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) ADNOC द्वारे व्यवस्थापित एका LNG टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली असून, ते सध्या भारताजवळ दिसत आहे. याची पुष्टी झाली, तर २८ फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारा हा पहिला मालवाहू LNG टँकर ठरेल. एडीएनओसी लॉजिस्टिक्स अँड सर्व्हिसेसद्वारे चालवला जाणारा १३६३५७ घनमीटर क्षमतेचा टँकर ३० मार्च रोजी शेवटचा आखाती प्रदेशात दिसला होता. आयसीआयएस एलएनजी एज, मरीनट्रॅफिक आणि एलएसईजी (लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप) यांच्या माहितीनुसार, तो आता भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ दिसला आहे.
दरम्यान, जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी एक युक्ती अवलंबली होती. या जहाजाने आपली सिग्नल यंत्रणा बंद केली होती, ज्यामुळे काही काळासाठी या जहाजाचा शोध घेणे कठीण झाले होते. त्यामुळे या जहाजाचा मार्ग कोणाच्याही लक्षात आला नाही. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्यानंतर या जहाजाने आपली सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू केली, असा कयास बांधला जात आहे.
Web Summary : An LNG tanker, missing for a month, resurfaced near India after potentially crossing the Hormuz Strait. Amid US-Iran tensions, this marks a significant maritime event, raising questions about navigation tactics and regional trade dynamics.
Web Summary : एक LNG टैंकर, जो एक महीने से गायब था, होर्मुज जलडमरूमध्य पार करने के बाद भारत के पास दिखाई दिया। अमेरिका-ईरान तनाव के बीच, यह एक महत्वपूर्ण समुद्री घटना है, जो नेविगेशन रणनीति और क्षेत्रीय व्यापार गतिशीलता पर सवाल उठाती है।