Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं

By सुशांत जाधव | Updated: April 28, 2026 18:24 IST

Open in App
1 / 7

IPL च्या इतिहासात धावांचा जलदगतीने यशस्वी पाठलाग करत सर्वाधिक चेंडू राखून मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम मागील १९ वर्षांपासून मुबई इंडियन्सच्या नावे आहे.

2 / 7

२००८ च्या पहिल्या वहिल्या हंगामात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेल्या ६८ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने ५.३ षटकात सामना जिंकला होता.

3 / 7

मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये ८७ चेंडू राखून विक्रमी विजय मिळवून देण्यात सनथ जयसूर्यानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तेंडुलकर शून्यावर बाद झाल्यावर त्याने या सामन्यात १७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी केली होती.

4 / 7

२०२६ च्या हंगामात RCB च्या संघाने DC नं दिलेल्या ७६ धावांचा पाठलाग करताना ८१ चेंडू राखून सामना जिंकला. हा IPL च्या इतिहासातील धावांचा यशस्वी पाठलाग करताना मिळवलेला सर्वात जलदगतीने मिळवलेला दुसरा विजय आहे.

5 / 7

या यादीत कोची टस्कर्स केरळ संघ तिसऱ्या स्थानी आहे. २०११ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सनं दिलेल्या ९८ धावांचा पाठलाग करताना त्यांनी ७६ चेंडू राखून विजय नोंदवल्याचा रेकॉर्ड आहे.

6 / 7

२०१७ च्या हंगामात पंजाब किंग्सने ६७ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला ७३ चेंडू राखून पराभूत केले होते.

7 / 7

२०१८ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ६९ धावांचा पाठलाग करताना RCB च्या संघाविरुद्ध ७२ चेंडू राखून विजय मिळवला होता. IPL मध्ये सर्वात जलदगतीने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या यादीत SRH टॉप ५ मध्ये आहे.

टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स