शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:19 IST

"हे सेल्फ रेडिकलायझेशनचे प्रकरण आहे. याला केवळ काही तरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे, इतर धर्मियांना मारायचे, अशा विचारातून त्यांने हे कृत्य केले आहे. याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत? हे आता तपासातून पुढे येईल," असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

मीरा रोड येथील नयानगर भागात रविवारी पहाटे एका माथेफिरूने दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. जुबैर अंसारी (३१) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याने अगदी पहलगाम स्टाइल हल्ला केला. त्याने धर्माची विचारपूस करून कलमा वाचता येतो का? असा सवाल करत सुरक्षा रक्षकांवर चाकूहल्ला केला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "हे सेल्फ रेडिकलायझेशनचे प्रकरण आहे. याला केवळ काही तरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे, इतर धर्मियांना मारायचे, अशा विचारातून त्यांने हे कृत्य केले आहे. याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत? हे आता तपासातून पुढे येईल," असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? -"हे जे प्रकरण आहे हे बघितलं तर सेल्फ रेडिकलायझेशनचे प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा (अतिरेकीपणा, कट्टरतावाद) जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नातून ही व्यक्ती, हा आरोपी तयार झालेला दिसत आहे. त्यामुळे याला केवळ काही तरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे, इतर धर्मियांना मारायचे आहे, अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांने हे कृत्य केले आहे. त्याला पकडण्यात आले आहे. आता एटीएस आणि एनआयएची मदत घेऊन, या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे? हेही शोधण्यात येईल. याचे कुटुंब परदेशात आहे, अमेरिकेत आहे. हाही अनेक वर्षे परदेशात राहिला आहे. यानंतर इथे आल्यानंतर, पहिल्यांना कुर्ल्यात आणि नंतर नयानगरमध्ये तो रहायला आला. आता याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत? अजून कोणी असे रॅडिकलाईज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील."

काय आहे संपूर्ण प्रकरण? -मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ च्या सुमारास मीरा रोड पूर्व येथील नया नगर भागात एका निर्माणाधीन इमारतीवर राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोन सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी जुबैर तिथे आला. त्याने दोन्ही रक्षकांना त्यांची नावे आणि धर्म विचारला. त्यानंतर त्याने त्यांना कलमा वाचता येतो का? अशी विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी नाही, असे म्हणताच, जुबेरने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुब्रतो सेन यांनी सुरक्षा केबिनमध्ये लपून आपला जीव वाचवला आणि पोलिसांना माहिती दिली.'लोन वुल्फ' अटॅकचा संशय -आरोपीकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत 'LONE WOLVES WILL POUNCE ON YOU' आणि हिंदुस्थानातील खऱ्या जिहादची भाषा वापरण्यात आली आहे. तसेच यात गाझा आणि जिहाद या शब्दांचाही उल्लेख आहे. तपासानुसार, अंसारी सातत्याने इंटरनेटवर आयएसआयएसशी संबंधित कट्टरपंथी व्हिडिओ पाहत असे. आरोपी उच्चशिक्षित असून त्याने २०१९ पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. तो एका कोचिंग सेंटरमध्ये गणित आणि रसायनशास्त्र शिकवत असे. हा हल्ला पूर्व नियोजित होता की रागाच्या भरात केला गेला, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीचा मोबाईल, ब्राउझिंग हिस्ट्री आणि तो कोणाच्या संपर्कात होता का, याची कसून चौकशी केली जात आहे. एकट्यानेच कट रचून हल्ला करण्याच्या पद्धतीला लोन वुल्फ अटॅकशी हा प्रकार मिळताजुळता असल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Road Attack: CM Fadnavis calls it 'self-radicalization' case.

Web Summary : CM Fadnavis links Mira Road attack to self-radicalization, fueled by extremist materials. Accused, Zubair Ansari, attacked security guards after questioning their faith. Investigation ongoing to uncover connections and radicalization sources, with potential NIA involvement.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapurसोलापूर