Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:39 IST

खाजगी क्षेत्रातील बँकेनं आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर बँकेनं ही माहिती दिली.

खाजगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेनं आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर बँकेनं ही माहिती दिली. सिटी युनियन बँक १:३ या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे, म्हणजेच बँकेच्या प्रत्येक ३ शेअर्सच्या बदल्यात गुंतवणूकदारांना १ फ्री शेअर मिळेल. बँकेनं अशा प्रकारे बोनस शेअर्स देण्याची ही तिसरी वेळ आहे. या घोषणेनंतर मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वाढून २९३.५५ रुपयांवर पोहोचले.

बोनस शेअर्सचा इतिहास आणि डिविडंड

सिटी युनियन बँकेने अद्याप बोनस शेअर्ससाठी 'रेकॉर्ड डेट' जाहीर केलेली नाही. यापूर्वी बँकेनं दोनदा बोनस शेअर्स दिले आहेत. जुलै २०१७ मध्ये आणि जुलै २०१८ मध्ये बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं. याव्यतिरिक्त, बँकेनं आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति शेअर २ रुपये डिविडंड (लाभांश) देण्याची शिफारस केली आहे.

Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत

बँकेचा तिमाही नफा ३६० कोटी रुपयांवर

खाजगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेला चौथ्या तिमाहीत ३६० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च २०२५ च्या तिमाहीत बँकेला २८८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. चौथ्या तिमाहीत बँकेचं 'नेट इंटरेस्ट इनकम' वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून ७८६ कोटी रुपये झालं. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही एका तिमाहीत मिळवलेला हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी बँकेचा एकूण निव्वळ नफा १,३२६ कोटी रुपये राहिला असून, वार्षिक आधारावर त्यात १८ टक्क्यांची वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये बँकेचा निव्वळ नफा १,१२४ कोटी रुपये होता.

वर्षभरात शेअर्समध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ

सिटी युनियन बँकेचे शेअर्स गेल्या एका वर्षात ६० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. २८ एप्रिल २०२५ रोजी बँकेचा शेअर १७८.४० रुपयांवर होता, जो २८ एप्रिल २०२६ रोजी २९३.५५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये १८ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. सिटी युनियन बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३१९.९५ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १७२ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा