भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी दुपारी न्या. इचपुराणी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
खरातने स्वत: कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून, मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीला पाण्यामध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास दैवी शक्तीने तिच्या मुलांना ठार मारण्याची व तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप या गुन्ह्याप्रकरणी खरातवर आहे.
"माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
एसआयटीचे तपास अधिकारी भारती यांनी खरातवर वरीलप्रमाणे गंभीर आरोप असून, प्राथमिक चौकशी फक्त पूर्ण झाली आहे. अनेक धागेदोरे तपासायचे असल्याने सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला की, खरातने या गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याला या गुन्ह्यात कोण साथ देत होतं, गुंगीकारक पदार्थात कोणते औषध मिसळले वैगेरे तपास बाकी असल्याने सहा दिवसांची पोलीस कोठडीची गरज विषद केली. तर खरातच्या वकिलांनी मात्र पोलीस कोठडीला जोरदार विरोध करत प्रत्येक गुन्ह्याच्या सुनावणीत सरकारी वकील तसेच तपास आधिकारी तेच ते मुद्दे मांडून पोलीस कोठडी मागत असल्याचे सांगून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मात्र न्या. इचपुरानी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
खरातच्या कार्यालयातून अंगठीची ३५ मापे
सातव्या गुन्ह्याचा तपास करताना भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात १३.० ते २४.२ या आकाराचे बोटातील अंगठी बनवण्याची एकूण ३५ गोलाकार मापे एका स्टीलच्या कडीमध्ये आढळून आल्याने एसआयटीलाही धक्का बसला. खरात हा पीडित महिला तसेच त्याच्या जाळ्यात अडकलेल्या भक्तांच्या बोटाचे माप घेऊन त्यांना पाच हजारांची अंगठी लाखो रुपयांना विकत होता. त्याच कामासाठी वेगवेगळ्या आकारातील अंगठीतील मापे खरात आपल्याजवळ बाळगत असे.
झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं
एक धनादेश जप्त
तसेच त्याच्या कार्यालयात एका महिलेच्या नावाने असलेला मोठ्या रकमेचा धनादेश देखील सापडला असून, ही महिला कोण आहे, तिचे खरातसोबत कनेक्शन हे गूढ मात्र कायम आहे. खरात भक्त तसेच पीडितांकडून पैसे उकळत असल्याचा संशय देखील यामुळे बळावला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास बाकी असल्याने खरातला सहा दिवसांची पोलीस कोठडी सरकारी अभियोक्त्यांनी मागितली.
अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय
भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
सहा दिवसांच्या पोलीस कोठडीची कारणे
सरकारी वकील व तपास अधिकाऱ्यांनी पुढील कारणे सहा दिवसांच्या पोलिस कोठडीसाठी दिली. खरातने गुन्हा का केला त्याचा उद्देश व हेतू तपासणे, आरोपीने पीडित महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन बलात्कार केला. गुंगीकारक पदार्थ व तो कुठून मिळवला याची चौकशी बाकी, आरोपी भोंदूबाबा असून, धार्मिक विधीच्या नावाखाली इतर गैरप्रकार केले का? याचा तपास करणे गरजेचे, घटनास्थळी मिळालेल्या धनादेशासंदर्भात संबंधित महिलेची ओळख व चौकशी बाकी, घटनास्थळी सापडलेल्या अंगठी मापकांच्या वापराबाबत तपास, बलात्कारप्रकरणी आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे.
Web Summary : Ashok Kharat received three days police custody for rape under guise of divine power. He threatened to kill her children and destroy her life if she revealed his crime. Police investigate accomplices, drugs used, and seized evidence like ring sizers and a suspicious check.
Web Summary : अशोक खरात को दैवीय शक्ति के नाम पर बलात्कार के आरोप में तीन दिन की पुलिस हिरासत मिली। उसने शिकायत करने पर बच्चों को जान से मारने और जीवन बर्बाद करने की धमकी दी। पुलिस सहयोगियों, इस्तेमाल की गई नशीली दवाओं और अंगूठी साइज़र जैसे जब्त किए गए सबूतों की जांच कर रही है।