तेहरान : इराणचे तेल क्षेत्र सध्या तीव्र दबावाखाली आले असून, साठवणुकीची क्षमता संपत आल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिकन निर्बंध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे तेल निर्यात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. परिणामी, कच्च्या तेलाचा साठा वेगाने वाढत असून तो साठवण्याची जागा अपुरी पडत आहे.
इराणच्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा खार्ग बेटावरून येतो. येथे सुमारे ३ कोटी बॅरल साठवणूक क्षमता असून ती जवळपास पूर्ण भरली आहे. सध्या फक्त १.३ कोटी बॅरल जागा उरली असून, दररोज १० ते ११ लाख बॅरल तेल जमा होत आहे. या गतीने पुढील १२ ते १३ दिवसांत साठवणूक पूर्ण भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १६ एप्रिलच्या उपग्रह चित्रांनुसार, खार्ग टर्मिनलवर तीन टँकरमध्ये एकूण ५० लाख बॅरल तेल लोड करण्यात आले होते. अतिरिक्त साठ्यासाठी इराणने ३० वर्षे जुना ‘नाशा’ टँकर पुन्हा वापरात आणला आहे.
विहिरींना धोकाइराणला ‘वॉटर इंजेक्शन’ तंत्रज्ञानावर चालणाऱ्या विहिरी सतत कार्यरत ठेवणे आवश्यक असल्याने त्या बंद केल्यास कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका आहे.
जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणामयुद्धविराम लागू असला तरी अमेरिका आणि इराण यांच्यात सामुद्रधुनीवरून तणाव कायम आहे. शांततेच्या काळात जगातील सुमारे २०% तेल आणि गॅस व्यापार या मार्गाने होतो. अमेरिकेची नाकेबंदी इराणला तेल विक्रीपासून रोखण्यासाठी असून, त्यामुळे त्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.सामुद्रधुनी बंद झाल्याने तेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. खाडीतील देशांनाही त्यांच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. सामुद्रधुनी बंद असल्याने आखातातील अनेक टँकर अडकून पडले आहेत, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.
चर्चा पुढे ढकलण्याचा प्रस्तावइराणने अणू कार्यक्रमावरील चर्चा पुढील टप्प्यात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणे हे युद्धाचे एक प्रमुख कारण आहे. इराणने आपला अणू कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचे म्हटले असले, तरी अमेरिकेची मागणी आहे की इराणने उच्च स्तरावर समृद्ध युरेनियमचा साठा कमी करावा.
प्रादेशिक तणाव
लेबनॉन आणि इस्रायल : अमेरिकेने मध्यस्थी करूनही लेबनॉनमधील शस्त्रसंधी अपयशी ठरत आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.
आखाती देशांची सुरक्षा : इराणच्या प्रतिहल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी इस्रायलने आपली 'आयर्न डोम' संरक्षण प्रणाली यूएईमध्ये तैनात केली आहे.
Web Summary : Iran's oil sector is strained as storage nears capacity due to US sanctions hindering exports. Kharg Island's storage is almost full, threatening production. Regional tensions escalate with stalled peace talks and heightened security measures. Nuclear program discussions are also postponed, increasing uncertainty.
Web Summary : अमेरिकी प्रतिबंधों के कारण ईरान का तेल क्षेत्र दबाव में है, भंडारण क्षमता समाप्त हो रही है। खर्ग द्वीप का भंडारण लगभग पूरा हो गया है, जिससे उत्पादन खतरे में है। क्षेत्रीय तनाव बढ़ रहा है, शांति वार्ता रुकी हुई है और सुरक्षा उपाय कड़े किए गए हैं। परमाणु कार्यक्रम पर चर्चा भी स्थगित, अनिश्चितता बढ़ी।