Join us
Daily Top 2Weekly Top 5

"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:36 IST

Mumbai Railway Control Room Threat Call: मध्यरात्री तीनच्या सुमारास धमकीचा फोन आल्याची माहिती

Mumbai Railway Control Room Threat Call: मुंबईच्यारेल्वेपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. इरफान नावाच्या व्यक्तीने रेल्वे नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिल्याचे समजते आहे. ५ कोटी रूपये द्या अन्यथा सरकारशी बोलणे करून द्या अशी मागणी या व्यक्तीने केल्याची माहिती आहे. आपली मागणी पूर्ण न झाल्यास रेल्वे, आर्मी ऑफिस आणि महत्त्वाच्या हॉटेल्सला लक्ष्य केले जाईल, अशी धमकी त्याने दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या घटनेचा आणि फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईतील रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव इरफान असल्याचे सांगितले. हा फोन मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आला होता. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने पोलिसांकडे थेट पाच कोटी रूपयांची मागणी केली. आपली मागणी पूर्ण न झाल्यास रेल्वेसेवा, लष्करी सेवांचे कार्यालय किंवा उच्चभ्रू वस्तीतील मोठी हॉटेल्स यांच्यावर हल्ला केला जाईल, अशी धमकी इरफानने दिल्याचे वृत्त एबीपीमाझाने दिले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने असेही म्हटले आहे की, ५ कोटींची रक्कम देणे शक्य नसेल तर माझे सरकारमधील अधिकारी किंवा संबंधित मंडळींशी बोलणे करून द्या, अन्यथा मी काही ठिकाणांना लक्ष्य करेन.

हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिस यंत्रणा तातडीने कामाला लागली असून त्यांच्या तपासाला वेग आला आहे. हा फोन नेमका कुठून आला, इरफान नावाचा व्यक्ती नेमका कोण आहे, या धमकीमागे काय हेतू असेल, अशा विविध पैलूंचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याआधीही काही वेळा विविध यंत्रणांना असे धमकीचे फोन आले होते. त्या प्रकरणांतील धमकी देणाऱ्या व्यक्तींना त्या-त्या वेळी ताब्यात घेण्यात आणि आणि योग्य ती कारवाई करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Railway Control Room Receives Threat Call for 5 Crore

Web Summary : Mumbai railway control received a threat demanding ₹5 crore or government talks. Failure to comply would result in attacks on railways, army offices, and hotels. Police are investigating the caller, identified as Irfan.
टॅग्स :रेल्वेपोलिसमुंबईगुन्हेगारी