Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:18 IST

Open in App
1 / 9

क्रिकेटच्या खेळात मैदानावरील कामगिरी आणि तंदुरूस्ती फार महत्त्वाची असते. संघातील आपली जागा टिकवण्यासाठी या बाबी निर्णायक ठरते.

2 / 9

याचदरम्यान, इंग्लंड क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ३० वर्षीय खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

3 / 9

कॅमेरॉन स्टील असे क्रिकेटपटूचे नाव असून, तो सरे काउंटीचा खेळाडू आहे. २०२४मध्ये त्याला एक गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती.

4 / 9

या गंभीर दुखापतीनंतर त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. पण त्यानंतरही त्याला क्रिकेटच्या मैदानावर यशस्वी पुनरागमन करता आले नाही.

5 / 9

दीर्घकाळ वाट पाहूनही तो खेळण्यासाठी तंदुरूस्त झाला नाही. अखेर वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याने व्यावसायिक क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.

6 / 9

२०२४ मध्ये त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याच्यावर ब्रॉन्कोस्टॉमी दुरुस्तीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

7 / 9

मे २०२५ मध्ये तो मैदानावर परतला, परंतु त्याला दुखापतीमुळे त्रास होतच राहिला. यामुळे सप्टेंबर २०२५ मध्ये त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली.

8 / 9

त्यानंतर सहा महिन्यांची पुनर्वसन प्रक्रिया पार पडली. अखेरीस, वैद्यकीय सल्ल्यानुसार, त्याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

9 / 9

कॅमेरॉन स्टीलने ६६ प्रथम-श्रेणी सामन्यांत २७३३ धावा आणि ६० बळी घेतले. तर लिस्ट ए मध्ये ६६६ धावा केल्या आणि ४५ बळी घेतले. (सर्व फोटो सौजन्य- कॅमरॉन स्टील इन्स्टाग्राम)

टॅग्स :ऑफ द फिल्डडॉक्टरवैद्यकीय