Stock Market Today: मंगळवारी घरगुती शेअर बाजारानं घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, बीएसई (BSE) सेन्सेक्स २०८.८४ अंकांच्या (०.२७ टक्के) घसरणीसह ७७,०९४.७९ अंकांवर उघडला. तर, एनएसई (NSE) निफ्टी ५० इंडेक्सनंही आज ४२.८० अंकांची (०.१८ टक्के) घसरण नोंदवत २४,०४९.९० अंकांवर व्यवहार सुरू केला. विशेष म्हणजे सोमवारी बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला होता. काल सेन्सेक्स ६३९.४२ अंकांच्या तेजीसह ७७,३०३.६३ वर आणि निफ्टी १९४.७५ अंकांच्या वाढीसह २४,०९२.७० वर स्थिरावला होता.
निम्म्याहून अधिक कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये
मंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ८ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले, तर उर्वरित २२ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० मधील ५० पैकी केवळ १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आणि ३४ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह उघडले, तर ३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये 'एलअँडटी'चा शेअर सर्वाधिक ०.३६ टक्क्यांच्या वाढीसह उघडला, तर 'भारतीय स्टेट बँक' (SBI) चा शेअर सर्वाधिक १.२५ टक्क्यांच्या घसरणीसह उघडला.
मंगळवारी ग्रीन झोनमध्ये उघडलेले स्टॉक्स
सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये आज टीसीएसचे शेअर्स ०.२८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.२१ टक्के, बीईएल ०.१३ टक्के, एनटीपीसी ०.०७ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.०७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.०५ टक्के आणि बजाज फायनान्सचे शेअर्स ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह उघडले.
इटर्नल, ॲक्सिस बँक आणि इतर शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, मंगळवारी इटर्नलचे शेअर्स १.२१ टक्के, ॲक्सिस बँक ०.८४ टक्के, ट्रेंट ०.८० टक्के, इंडिगो ०.७८ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.६६ टक्के, टायटन ०.६३ टक्के आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स ०.५९ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.
तसंच एशियन पेंट्स, सन फार्मा, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या शेअर्समध्येही आज घसरण पाहायला मिळाली.
Web Summary : Indian stock market opened in the red on Tuesday. Sensex and Nifty both declined. Most stocks traded lower, with only a few in the green. SBI saw the biggest drop, while L&T gained the most.
Web Summary : भारतीय शेयर बाजार मंगलवार को गिरावट के साथ खुला। सेंसेक्स और निफ्टी दोनों में गिरावट आई। ज्यादातर शेयरों में गिरावट रही, केवल कुछ ही हरे निशान में थे। एसबीआई में सबसे बड़ी गिरावट आई, जबकि एलएंडटी में सबसे ज्यादा तेजी आई।