Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?

एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?

शानदार निकालांनंतर कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर २४० रुपयांच्या भरघोस लाभांशाची घोषणा केली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि तुमच्याकडे आहे का हा शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 09:59 IST2026-04-28T09:57:37+5:302026-04-28T09:59:10+5:30

शानदार निकालांनंतर कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर २४० रुपयांच्या भरघोस लाभांशाची घोषणा केली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि तुमच्याकडे आहे का हा शेअर?

ultratech cement will give dividend of Rs 240 per share Do you have this stock announcement after a sharp increase in profits | एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?

एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Dividend Stocks: देशातील आघाडीची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंटनं आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सरलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा २० टक्क्यांनी वाढून ३,०००.०२ कोटी रुपये झाला. या शानदार निकालांनंतर कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर २४० रुपयांच्या भरघोस लाभांशाची (Dividend) घोषणा केली आहे.

आदित्य बिर्ला समूहाच्या या कंपनीने सोमवारी माहिती दिली की, मागील वर्षाच्या (२०२४-२५) जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने २,४७४.७९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या मार्च तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न २५,७९९.४७ कोटी रुपये राहिलं, जे मागील वर्षी २३,०६३.३२ कोटी रुपये होतं.

ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?

मार्च तिमाहीत आतापर्यंतची विक्रमी विक्री

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तीन महिन्यांचे आणि पूर्ण वर्षाचे निकाल मागील वर्षाच्या याच कालावधीतील निकालांशी तुलना करण्यायोग्य नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे दक्षिण भारतातील 'इंडिया सिमेंट लिमिटेड' (ICL), 'बिर्ला व्हाईट वॉलकेअर' (पूर्वीचे वंडर वॉलकेअर) आणि युएई मधील 'आरएकेडब्ल्यूसीटी' (RAKWCT) यांचं अधिग्रहण आहे. या तिमाहीत अल्ट्राटेकचा एकूण खर्च २१,८९४.१८ कोटी रुपये राहिला. कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, या तिमाहीत त्यांनी आतापर्यंतच्या 'सर्वोच्च विक्रीचा' विक्रम प्रस्थापित केलाय.

२४० रुपयांचा लाभांश

मार्च तिमाहीत अल्ट्राटेकचं एकूण एकत्रित उत्पन्न २५,८८७.०३ कोटी रुपये राहिलं. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा एकूण नफा ८,१८८.३५ कोटी रुपये झालाय. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी एकूण एकत्रित उत्पन्न ८९,०८९.०४ कोटी रुपये नोंदवण्यात आलं. पूर्ण वर्षासाठी भारतात 'ग्रे सिमेंट'ची एकूण विक्री १४.५ कोटी टन इतकी झाली.

"कठीण परिस्थिती असूनही अल्ट्राटेकने कामगिरीच्या प्रत्येक पैलूत विक्रीचं प्रमाण, महसूल, नफा आणि बॅलन्स शीट मजबूतीमध्ये शानदार निकाल दिले आहेत," असं कंपनीनं स्पष्ट केलं. दरम्यान, कंपनीच्या बोर्डानं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरवर २४० रुपयांचा बंपर लाभांश जाहीर केलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : अल्ट्राटेक सीमेंट का मुनाफा बढ़ने पर ₹240 डिविडेंड का ऐलान: क्या आपको निवेश करना चाहिए?

Web Summary : अल्ट्राटेक सीमेंट ने Q4 में 20% शुद्ध लाभ वृद्धि के बाद ₹240 प्रति शेयर डिविडेंड की घोषणा की। राजस्व बढ़कर ₹25,799.47 करोड़ हो गया। मजबूत बिक्री और रणनीतिक अधिग्रहणों ने विकास को बढ़ावा दिया। निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।

Web Title : UltraTech Cement Announces ₹240 Dividend After Profit Surge: Should You Invest?

Web Summary : UltraTech Cement declared a ₹240 dividend per share following a 20% net profit increase in Q4. Revenue rose to ₹25,799.47 crore. Strong sales and strategic acquisitions drove growth, with record-breaking quarterly sales. Consult experts before investing.