Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:35 IST

'राजा शिवाजी'मध्ये साकारणार 'ही' भूमिका

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा सध्या चर्चेत आहे. १ मे रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मराठी, हिंदीतील अनेक कलाकारांची फौज आहे. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी हे मराठी कलाकार आहेत. तर अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, सलमान खान अशी तगडी स्टारकास्ट आहे. दरम्यान सिनेमात सैराट सिनेमात दिसलेले आर्चीचे वडीलही आहेत. त्यांनी रितेशसोबत फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

अनेक मराठी सिनेमांमध्ये लक्षवेधी, कणखर तर कधी खलनायकी भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांची 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका आहे. त्यांनी रितेशसोबतचा सेटवरील फोटो शेअर करत लिहिले, "१ मे पासून भारतभर प्रदर्शित होणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या भव्यपटात चंद्रराव मोरेच्या भूमिकेत..!!रितेश विलासराव देशमुख या अतिशय संस्कारी आणि विनम्र अभिनेता-दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव..!!"

सुरेश विश्वकर्मा नुकतेच 'गोंधळ' सिनेमातही दिसले. तसंच 'मुळशी पॅटर्न' या गाजलेल्या चित्रपटातही त्यांची भूमिका लक्षात राहिली. त्यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर विश्वकर्मा गावातून मुंबईत आले आणि त्यांच्या स्ट्रगलला सुरुवात झाली. या दरम्यान त्यांनी स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केले. पण, त्यांना खरी ओळख ती नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटामुळे मिळाली. सुरेश विश्वकर्माने 'सैराट' चित्रपटाशिवाय 'रेगे', 'महिमा खंडोबाचा', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या मराठी चित्रपटात झळकले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Sairat' Fame Actor to Shine in 'Raja Shivaji' with Riteish.

Web Summary : Suresh Vishwakarma, known from 'Sairat', will play Chandrarao More in Riteish Deshmukh's 'Raja Shivaji', releasing May 1st. He shared a photo with Riteish, praising the actor-director's humility. Vishwakarma has also appeared in 'Mulshi Pattern' and 'Gondhal'.
टॅग्स :रितेश देशमुखमराठी चित्रपटराजा शिवाजी चित्रपट