अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वीच मोठी गुडन्यूज दिली. दीपिका दुसऱ्यांदा आई होणार आहे. लेक दुआच्या जन्मानंतर दीड वर्षांनी दीपिका पुन्हा गरोदर आहे. दुसऱ्या प्रेग्नंसीतही दीपिका प्रोफेशनल कमिटमेंट्स पाळत आहे. 'किंग' आणि 'राका' या दोन सिनेमांमध्ये ती दमदार अॅक्शन सीक्वेन्स शूट करत आहे. दरम्यान दुसऱ्या प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिकाची झलक दिसली. रणवीर सिंहसोबत ती विमानतळावर दाखल झाली. तिला पाहून सर्वांचं लक्ष तिच्या बेबी बंपकडेच गेलं. तर रणवीर सिंह बायकोची काळजी घेताना दिसला. या पॉवर कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
१९ एप्रिल रोजी दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसून आली. मुंबई विमानतळावर दीपिका आणि रणवीर सिंह यांना एकत्र स्पॉट झाले. दीपिकाने लूज डेनिम शर्ट परिधान केला आहे. तरीही तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत होता. तर रणवीर सिंह तिची काळजी घेताना दिसला. यावेळी दोघंही पापाराझींना पोझ न देताच आत निघून गेले. रणवीरचा आपल्या पत्नीसाठी असलेला caring अंदाज चाहत्यांच्या मनाला भावला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी अधिकृत सोशल मीडियावर पेजवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दीपिका आणि रणवीरने १९ एप्रिल रोजी त्यांच्या लाडक्या लेकीच्या म्हणजेच दुआच्या हातात प्रेग्नन्सी किट पकडलेला एक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली होती. २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने सप्टेंबर २०२४ मध्ये पहिल्या मुलीचे म्हणजेच दुआचे स्वागत केले होते. आता अवघ्या काही महिन्यांतच हे कपल दुसऱ्यांदा पालक होणार असल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे, प्रेग्नन्सीच्या काळातही दीपिका कामातून ब्रेक घेताना दिसत नाहीये.
दुसरीकडे, रणवीर सिंहसाठीही हे वर्ष यशाचे ठरत आहे. मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता रणवीर लवकरच जय मेहता दिग्दर्शित 'प्रलय' या चित्रपटात झळकणार आहे. एका बाजूला वैयक्तिक आयुष्यातील आनंद आणि दुसरीकडे व्यावसायिक यश अशा दुहेरी कारणांमुळे हे पॉवर कपल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
Web Summary : Deepika Padukone, expecting her second child, was spotted at the airport with Ranveer Singh. Her loose shirt revealed her baby bump, sparking excitement. Ranveer's caring gesture towards Deepika was appreciated. The couple announced their pregnancy in April and are expecting their second child after Dua.
Web Summary : अपने दूसरे बच्चे की उम्मीद कर रहीं दीपिका पादुकोण रणवीर सिंह के साथ एयरपोर्ट पर स्पॉट की गईं। उनके ढीले शर्ट ने उनके बेबी बंप को दिखाया, जिससे उत्साह बढ़ गया। दीपिका के प्रति रणवीर के देखभाल करने वाले भाव की सराहना की गई। दंपति ने अप्रैल में अपनी गर्भावस्था की घोषणा की और दुआ के बाद अपने दूसरे बच्चे की उम्मीद कर रहे हैं।