By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:50 IST
1 / 7फक्त श्रीमंत वा हुशार लोकांनाच समाजात आदर मिळतो असे नाही. चाणक्य म्हणतात की, आदर हा मागून मिळत नाही, तो आपल्या कर्तृत्वातून आणि वागणुकीतून कमावावा लागतो. जर तुम्हालाही वाटत असेल की चार चौघांत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं वजन असावं, तर खालील सवयी तुमच्या जीवनाचा भाग बनवा. 2 / 7चाणक्यांच्या मते, तुमची जीभ हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जे लोक विचार करून बोलतात आणि ज्यांच्या बोलण्यात नम्रता असते, त्यांना लोक आपोआपच मान देतात. विनाकारण बडबड करण्यापेक्षा मुद्द्याचं बोलणं महत्त्वाचं आहे. गोड बोलणाऱ्या व्यक्तीचे शत्रू कमी आणि मित्र जास्त असतात.3 / 7वेळ कोणासाठीही थांबत नाही. जी व्यक्ती वेळेची किंमत जाणते, जग त्याची किंमत करतं. दिलेली वेळ पाळणे आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करणे, हे तुमच्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते. वक्तशीर माणसे विश्वासार्ह मानली जातात, ज्यामुळे समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढते.4 / 7चाणक्य नीतीमधील हा एक महत्त्वाचा धडा आहे— 'आपली गुपिते कधीही कोणालाही सांगू नका.' जेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवतपणा किंवा अत्यंत वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगता, तेव्हा लोक तुमचा आदर करण्याऐवजी तुमचा फायदा घेण्याची किंवा तुमची टर उडवण्याची शक्यता जास्त असते. स्वतःच्या योजना आणि खासगी गोष्टी सुरक्षित ठेवल्याने तुमचं 'गूढ' (Mystique) आणि आदर टिकून राहतो.5 / 7ज्ञानी व्यक्तीची पूजा सर्वत्र केली जाते. ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्याला कोणीही हरवू शकत नाही. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. मग ते वाचन असो, नवीन भाषा शिकणे असो किंवा आपल्या क्षेत्रातील कौशल्ये अद्ययावत करणे असो. ज्ञानी व्यक्तीचे मत समाजात गांभीर्याने घेतले जाते.6 / 7'सन्मान द्या आणि सन्मान मिळवा' हा निसर्गाचा नियम आहे. चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करते आणि लहानांशी प्रेमाने वागते, त्याला समाजात आपोआप मोठेपण मिळते. समोरच्या व्यक्तीचे पद किंवा श्रीमंती न पाहता, माणूस म्हणून त्यांना आदर देणे शिका. दुसऱ्याला आदर देता तेव्हा तुम्हालाही आदर मिळतो. 7 / 7आचार्य म्हणतात, 'एका उत्कृष्ट चारित्र्याशिवाय मिळालेला सन्मान हा फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुमची वागणूक आणि तत्वे नेहमी उच्च ठेवा.' समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या सवयींचा सराव आजपासूनच सुरू करा. फरक तुम्हाला स्वतःलाच जाणवेल.