शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:04 IST

Why smartphones become slow after 2 years : स्मार्टफोन कंपन्यांच्या 'प्लांड ऑब्सोलेसेन्स' धोरणाला युरोपीय संघाने लगाम लावला आहे. २०२७ पासून बॅटरी, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि स्पेअर पार्ट्सबाबत नवीन नियम लागू होणार आहेत. याचा भारतीय ग्राहकांना कसा फायदा होईल? वाचा सविस्तर.

स्मार्टफोन कंपन्या नवीन मॉडेल्स विकण्यासाठी जुन्या फोन्सचा वेग मुद्दाम कमी करतात किंवा बॅटरी खराब करतात, असे अनेकदा आरोप झाले आहेत. २०१७ मध्ये ॲपलने स्वतः हे मान्य केले होते. मात्र, आता युरोपीय संघाच्या नवीन नियमांमुळे कंपन्यांना आपला फोन 'दीर्घायुषी' बनवावाच लागणार आहे. याचा भारतालाही थेट फायदा होणार आहे. 

प्रत्येक स्मार्टफोनच्या बॅटरीने किमान ८०० चार्ज सायकल्सनंतरही ८०% क्षमता टिकवून ठेवली पाहिजे. यामुळे २-३ वर्षांनंतर अचानक बॅटरी उतरण्याचे प्रमाण थांबेल. कोणताही मॉडेल बंद झाल्यानंतरही कंपन्यांना पुढील ७ वर्षांपर्यंत त्याचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून द्यावे लागतील. तसेच, मागणी केल्यानंतर ५-१० दिवसांत त्याची डिलिव्हरी करणे बंधनकारक असेल.

जशी फ्रिजवर स्टार रेटिंग असते, तशीच आता फोनवर A ते E अशी 'रिपेअर रेटिंग' असेल. यामुळे ग्राहकांना समजेल की फोन खराब झाला तर तो दुरुस्त करणे किती सोपे किंवा कठीण आहे. सुरक्षा आणि फीचर्सच्या बाबतीत जुना फोन मागे पडू नये, यासाठी कंपन्यांना किमान ५ वर्षे अनिवार्य सॉफ्टवेअर अपडेट्स द्यावे लागतील.

भारतीय ग्राहकांसाठी याचे महत्त्व काय?जरी हे नियम युरोपसाठी असले, तरी स्मार्टफोन कंपन्या प्रत्येक देशासाठी वेगळे हार्डवेअर डिझाइन करत नाहीत. त्यामुळे युरोपमध्ये होणाऱ्या या बदलांचा थेट सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवर आणि ग्राहकांवरही होईल. या नवीन नियमांमुळे स्मार्टफोनचे सरासरी आयुष्य ३ वर्षांवरून वाढून ४.१ वर्षे होईल. यामुळे एका सरासरी कुटुंबाची वर्षाला सुमारे १०,७०० रुपयांची (९८ युरो) बचत होईल, असा अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Europe furious: Smartphones deliberately slowed down to force new purchases.

Web Summary : European Union regulations demand longer-lasting phones: batteries, spare parts, repair ratings, and software updates. This impacts Indian consumers positively, extending phone lifespan and saving money.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन