तेहरान/वॉशिंग्टन: मिडिल ईस्टमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना स्वतः इराणनेच सुरुंग लावला आहे. "पाकिस्तान हा आमचा मित्र नक्कीच आहे, पण तो या संघर्षात निष्पक्ष मध्यस्थी करण्याच्या लायक नाही," अशा स्पष्ट शब्दांत इराणच्या संसदेने पाकिस्तानची भूमिका फेटाळून लावली आहे.
इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजई यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेजई म्हणाले की, "पाकिस्तान अनेकदा अमेरिकेच्या आणि विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या हितांना प्राधान्य देतो. त्यांच्या विरोधात काहीही बोलण्याचे धाडस पाकिस्तान करत नाही. एक योग्य मध्यस्थ तोच असतो जो दोन्ही बाजूंकडे निष्पक्षपणे पाहतो, पण पाकिस्तानचा कल नेहमीच एका बाजूला झुकलेला असतो."
अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा फिसकटली?इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रशियामध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानमधील चर्चेच्या अपयशाचे खापर अमेरिकेवर फोडले. "अमेरिकेच्या अवास्तव आणि अवाजवी मागण्यांमुळे इस्लामाबादमधील शांतता चर्चा यशस्वी होऊ शकली नाही," असा आरोप अराघची यांनी केला. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा हा केवळ इराणचा नाही, तर जगाचा मुद्दा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांचा 'पाइपलाईन' ब्लास्टचा इशारादुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. "इराणकडे युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत, अन्यथा त्यांच्या तेल पाइपलाईन्समध्ये स्फोट होईल," अशी धमकी ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली. नाकेबंदीमुळे तेलाचा उपसा थांबला असून पाइपलाईनमधील वाढत्या दाबाने त्या तांत्रिक कारणांमुळे स्वतःहून फुटू शकतात आणि त्यांची दुरुस्ती अशक्य होईल, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
Web Summary : Iran dismissed Pakistan's mediation efforts in the Middle East conflict, citing bias. Iran blamed US demands for failed peace talks. Trump threatened to bomb Iranian oil pipelines if a ceasefire wasn't agreed upon within three days, claiming technical failures were imminent.
Web Summary : ईरान ने मध्य पूर्व संघर्ष में पाकिस्तान के मध्यस्थता प्रयासों को खारिज कर दिया, और पक्षपात का हवाला दिया। ईरान ने विफल शांति वार्ता के लिए अमेरिकी मांगों को दोषी ठहराया। ट्रम्प ने तीन दिनों के भीतर युद्धविराम पर सहमति नहीं होने पर ईरानी तेल पाइपलाइनों पर बमबारी करने की धमकी दी, और दावा किया कि तकनीकी विफलताएं आसन्न थीं।