Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका

Angkrish Raghuvanshi obstructing the field, KKR vs LSG IPL 2026: धाव घेताना झालेल्या घटनेमुळे अंगक्रिश रघुवंशी बाद ठरवण्यात आले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:47 IST

Open in App

Angkrish Raghuvanshi obstructing the field, KKR vs LSG IPL 2026: यंदाच्या हंगामातील पहिली सुपर ओव्हर रविवारी पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिलेले लक्ष्य पूर्ण करताना लखनौने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर रंगलेल्या सुपर ओव्हरमध्ये कोलकाताने विजय मिळवला. या सामन्यात धाव घेताना चेंडू अडवून क्षेत्ररक्षणास अडथळा आणल्याप्रकरणी कोलकाता नाईट रायडर्सचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला बाद ठरवण्यात आले. त्यानंतर त्याने वाद घातल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्धच्या सामन्यादरम्यान कोलकाताच्या डावाच्या पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल रघुवंशीला बाद घोषित करण्यात आले. या निर्णयानंतर तो संतापला. रागाच्या भरात त्याने आधी आपल्या बॅटने सीमारेषेवरील कुशनवर प्रहार केला आणि नंतर आपले हेल्मेट डगआऊटच्या दिशेने फेकले. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ नुसार, सामन्यादरम्यान रागाच्या भरात बॅट, हेल्मेट किंवा मैदानातील साहित्यावर प्रहार करणे किंवा ते फेकणे हे नियमांचे थेट उल्लंघन आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल रघुवंशीला त्याच्या सामना शुल्काच्या २०% दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. सामना पंचांनी याला लेव्हल १चा गुन्हा मानून तात्काळ कारवाई केली. रघुवंशीने आपली चूक कबूल केली आणि शिक्षा स्वीकारली, ज्यामुळे पुढील कारवाई टळली.

आयपीएलने अशा प्रकरणांमध्ये सातत्याने कठोर कारवाई केली आहे. खेळाची प्रतिष्ठा आणि शिस्त राखण्यासाठी खेळाडूंच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. रघुवंशीचे प्रकरण हे मैदानावर भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Angkrish Raghuvanshi Fined for On-Field Misconduct After Outburst

Web Summary : Angkrish Raghuvanshi faced a penalty after obstructing the field in a KKR vs LSG match. Frustrated, he damaged equipment, violating IPL's code of conduct. He received a fine and demerit point, highlighting IPL's strict stance on player behavior and maintaining game integrity.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्सलखनौ सुपर जायंट्सबीसीसीआय