Join us
Daily Top 2Weekly Top 5

Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!

Tim David & Romario Shepherd Play Gully Cricket: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन स्टार खेळाडू टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी दिल्लीत चाहत्यांसोबत चक्क गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:04 IST

Open in App

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन स्टार खेळाडू टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी दिल्लीत चाहत्यांसोबत चक्क गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. सामन्यापूर्वी अशा प्रकारे चाहत्यांसोबत वेळ घालवून या परदेशी खेळाडूंनी स्वतःवरील दडपण हलके केल्याचे दिसून येत आहे. या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात आज (२७ एप्रिल २०२६) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्याच्या काही तास आधी डेव्हिड आणि शेफर्ड दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये बॅट हातात घेऊन उतरले. स्टार क्रिकेटपटूंना चक्क घरासमोर खेळताना पाहून स्थानिक चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दोन्ही खेळाडूंनी प्लास्टिक बॉलने फलंदाजी केली.

टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत प्रचंड लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हे खेळाडू इतक्या तणावमुक्त वातावरणात क्रिकेटचा आनंद घेत असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना गंमतीने अनसिरियस गाईज असे म्हटले. सिंगापूर-ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा टिम डेव्हिड आणि वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज रोमारियो शेफर्ड या जोडीचा हा बिनधास्त अंदाज आरसीबीच्या चाहत्यांना कमालीचा भावला आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकून आपली विजयी लय कायम ठेवली आहे. आज अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणारा सामना आरसीबीसाठी विजेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात आरसीबीचा संघ नेमके कशी कामगिरी बजावते? हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Tim David and Romario Shepherd play gully cricket with fans!

Web Summary : Ahead of their match, RCB stars Tim David and Romario Shepherd enjoyed gully cricket with Delhi fans. The video of the players relaxing before the high-voltage match has gone viral. RCB faces Delhi Capitals in a crucial game today.
टॅग्स :आयपीएल २०२६व्हायरल व्हिडिओसोशल व्हायरलऑफ द फिल्ड