कधी कामाचा ताण, तर कधी विनाकारण येणारी अस्वस्थता आपला दिवस खराब करू शकते. पण आपल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी काही छोटे बदल खूप मोठी भूमिका बजावतात. अशा वेळी तुमच्या मनःस्थितीनुसार तुम्ही खालील गोष्टी करू शकता.
१. विचारांचं काहूर माजलं असेल तर (Overthinking)
जेव्हा मनात एकामागून एक विचारांचे चक्र सुरू असते आणि डोकं शांत होत नाही, तेव्हा 'लिहिणं' (Write) हा सर्वोत्तम उपाय आहे. मनात जे काही येतंय ते कागदावर उतरवा, यामुळे मन हलकं होतं आणि विचारांना दिशा मिळते.
२. अस्वस्थ किंवा भीती वाटत असेल तर (Anxious)
भविष्याची काळजी किंवा अस्वस्थता वाटत असेल, तर ५-१० मिनिटे शांत बसून 'ध्यान' (Meditate) करा. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मनातील भीती कमी होऊन तुम्हाला शांत वाटेल.
३. थकवा जाणवत असेल तर (Tired)
कधीकधी थकव्यामुळेही चिडचिड होते. अशा वेळी स्वतःला जास्त ओढण्यापेक्षा एक छोटी 'वामकुक्षी' (Nap) घ्या. २०-३० मिनिटांची झोप तुम्हाला पुन्हा ऊर्जा देऊ शकते.
४. उदास किंवा दुःख वाटत असेल तर (Sad)
जेव्हा मन विनाकारण उदास असतं, तेव्हा शारीरिक हालचाल उत्तम ठरते. 'व्यायाम' (Exercise) केल्यामुळे शरीरात 'हॅपी हार्मोन्स' (Endorphins) तयार होतात, जे तुमचा मूड त्वरित सुधारतात.
५. मानसिक ताण असेल तर (Stressed)
जर खूप जास्त स्ट्रेस जाणवत असेल, तर घराबाहेर पडा आणि थोडा वेळ 'फेरफटका मारा' (Go for a walk). निसर्गाच्या सानिध्यात किंवा ताज्या हवेत फिरल्याने मनावरचा ताण हलका होतो.
६. राग आला असेल तर (Angry)
राग अनावर होत असेल, तर कोणाशी वाद घालण्यापेक्षा Headphones लावा आणि आवडती गाणी ऐका. संगीतामध्ये मन शांत करण्याची विलक्षण शक्ती असते.
७. आळस जाणवत असेल तर (Lazy)
अनेकदा तासनतास मोबाईल बघितल्यानेही आळस येतो. जर तुम्हाला उत्साही वाटत नसेल, तर 'स्क्रीन टाईम कमी करा' (Reduce Screen Time). मोबाईल बाजूला ठेवून दुसरं काहीतरी कल्पक काम करा.
८. मानसिकरीत्या पूर्ण थकल्यासारखं वाटत असेल (Burnt Out)
जेव्हा कामाचा किंवा जबाबदारीचा खूप लोड येतो, तेव्हा विरंगुळा म्हणून एखादं चांगलं 'पुस्तक वाचा' (Read). वाचनामुळे तुम्ही काही काळ वेगळ्या विश्वात जाता आणि मनाला नवी उभारी मिळते.
हे सर्व उपाय आपल्या हातात आहेत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला 'लो' फील होईल, तेव्हा यापैकी एक गोष्ट नक्की करून पहा!
Web Summary : Feeling down? Simple activities like writing, meditating, napping, exercising, walking, listening to music, reading, and reducing screen time can boost your mood and refresh your mind, according to experts.
Web Summary : निराश महसूस कर रहे हैं? लेखन, ध्यान, झपकी, व्यायाम, संगीत सुनना, पढ़ना और स्क्रीन टाइम कम करना आपके मूड को बढ़ावा दे सकता है और आपके दिमाग को तरोताजा कर सकता है, विशेषज्ञों के अनुसार।