शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:51 IST

1 / 7
एक काळ असा होता, छोट्या छोट्या गोष्टींना लायसन लागत होते. आज तुम्ही महागडी सायकल घ्या, टीव्ही घ्या नाहीतर रेडिओ घ्या... फक्त पैसे लागतात.
2 / 7
पण पूर्वीच्या काळी म्हणजेच स्वातंत्र्यानंतरचा काळ, या प्रत्येक गोष्टीसाठी लायसन काढावे लागत होते. असेच मुंबईतील एका कुटुंबाला त्यांच्या आजोबांचे सायकलसाठीचे लायसन सापडले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 / 7
हा काळ १९५० ते १९६० चा होता. सायकलचे रजिस्ट्रेशन हे आताच्या मुंबई, तेव्हाच्या बॉम्बे महानगरपालिकेने दिले होते. या कार्डवर १९५६ सालचा उल्लेख आहे. त्या काळात मुंबईत (बॉम्बे) सायकलींसाठी परवाना अनिवार्य होता आणि असे टॅग सायकलींना लावले जात असत.
4 / 7
या लायसनवर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि बॉम्बे पोलीस कायद्याचा उल्लेख आहे. तसेच हे लायसन हस्तांतरीत करता येणार नाही व पोलिस जेव्हा मागतील तेव्हा दाखवावे लागले असे म्हटले आहे. या लायसनसाठी तेव्हा २ रुपये द्यावेल लागले आहेत. परवाना देण्याची ही पद्धत साधारणपणे १९६२ च्या आसपास बंद करण्यात आली.
5 / 7
सायकलच्या पुढील बाजूस किंवा मडगार्डवर एक लोखंडी किंवा तांब्याचा छोटा बिल्ला लावलेला असायचा, ज्यावर परवाना क्रमांक आणि वर्षाचा उल्लेख असायचा. सायकलचा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाऐवजी स्थानिक नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयातून दिला जात असे. हा परवाना दरवर्षी नूतनीकरण करावा लागायचा.
6 / 7
जर एखाद्या व्यक्तीकडे परवाना नसेल, तर पोलीस सायकल जप्त करत असत किंवा हवा सोडून देत असत. रात्रीच्या वेळी सायकलला दिवा (Dynamo light) असणे देखील अनिवार्य होते. दिवा नसेल तरीही पोलीस कारवाई करत असत.
7 / 7
सध्या सामान्य सायकल चालवण्यासाठी भारतात कोणत्याही लायसन्सची आवश्यकता नाही. एवढेच काय तर ५० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकीला देखील लायसन लागत नाही. जर इलेक्ट्रिक सायकलचा वेग ताशी २५ किमी पेक्षा कमी असेल आणि मोटरची क्षमता २५० वॅट्स पेक्षा कमी असेल, तर परवान्याची गरज नसते.
टॅग्स :CyclingसायकलिंगRto officeआरटीओ ऑफीस