'रिच डॅड पुअर डॅड' या पुस्तकाचे लेखक आणि दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी अनेकदा गुंतवणूकदारांना सल्ला देत असतात. त्यांनी अनेकदा मार्केटमध्ये मोठ्या क्रॅशची भविष्यवाणी केलीये. सोने-चांदी, बिटकॉइन आणि एथेरियममध्ये मोठी तेजी येईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या मते २०२६-२७ मध्ये मोठं आर्थिक संकट येणार आहे, ज्यामध्ये जे गुंतवणूकदार घाबरतील त्यांचं नुकसान होईल आणि जे तयार राहतील व क्रॅश दरम्यान स्वस्त दरात खरेदी करतील ते श्रीमंत होतील.
रॉबर्ट कियोसाकी यांचा सल्ला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर कियोसाकी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. "येणाऱ्या भीषण आर्थिक संकटात तुम्ही उद्ध्वस्त व्हाल की चांगली कमाई करून आनंदी व्हाल?" त्यांनी सांगितलं की १९८७, २०००, २००८, २०१५, २०१९ आणि २०२२ च्या मंदीत त्यांनी चांगली कमाई केली. आताही २०२६-२७ मध्ये येणाऱ्या भीषण मंदीत ते श्रीमंत होण्याची योजना आखत आहेत. त्यांच्या मते जेव्हा मंदी किंवा आर्थिक संकट येतं, तेव्हा मौल्यवान मालमत्ता स्वस्त किमतीत मिळू लागते. अशा वेळी तुम्ही स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करून श्रीमंत होऊ शकता, कारण त्या वेळी अनेक लोक मालमत्ता विकतात आणि त्यांचं मोठं नुकसान होतं.
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
रॉबर्ट कियोसाकी यांच्या मंदीच्या भविष्यवाणीबद्दल बोलायचे झाले तर, २०११ नंतर ते जवळपास दरवर्षी मार्केट क्रॅशचा इशारा देतात. त्यांचे अनेकदा दिलेले इशारे चुकीचे ठरले आहेत. यावेळीही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. २००८ च्या आधी त्यांनी क्रॅशबद्दल काही संकेत दिले होते जे खरे ठरले, परंतु त्यानंतर २०११, २०१५-१६, २०२२ आणि २०२५ मध्ये त्यांनी केलेल्या अशाच अनेक भविष्यवाण्या चुकीच्या ठरल्या. बाजारातील अनेक जाणकार तर त्यांचा सल्ला गुंतवणूकदारांना घाबरवणारा मानतात.
खरोखरच मोठी मंदी येणार का?
बाजारातील मुख्य अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, सध्या मध्य-पूर्व तणावामुळे मंदीचा सामना करावा लागत आहे आणि ती काही प्रमाणात वाढू शकते. परंतु, १९२९ मध्ये आलेल्या भीषण मंदीसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावं?
भारतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मधील गुंतवणूक सतत वाढत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अशा भविष्यवाणीच्या आधारावर आपला पोर्टफोलिओ बदलू नये. भारतीय गुंतवणूकदारांनी अशा वेळी रोख रक्कम, ॲसेट अलोकेशन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, न की एखाद्या ठराविक मंदीची वाट पाहत बसलं पाहिजं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Robert Kiyosaki forecasts a major financial crisis in 2026-27. He advises investors to buy assets cheap during the crash. Experts recommend focusing on asset allocation and long-term investments instead of predicting specific recessions.
Web Summary : रॉबर्ट कियोसाकी ने 2026-27 में एक बड़े वित्तीय संकट की भविष्यवाणी की है। उन्होंने निवेशकों को सलाह दी है कि वे संकट के दौरान सस्ती संपत्ति खरीदें। विशेषज्ञों का सुझाव है कि निवेशकों को मंदी की भविष्यवाणी करने के बजाय परिसंपत्ति आवंटन और दीर्घकालिक निवेश पर ध्यान केंद्रित करना चाहिए।