शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:11 IST

सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला करणारा जुबैर अंसारी ताब्यात; तपास आता ATS कडे!

Mira Road Stabbing: मुंबईनजीकच्या मीरा रोड परिसरात रविवारी पहाटे एका माथेफिरूने दोन सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. धर्माची विचारपूस करून कलमा वाचता येतो का? असा सवाल करत आरोपीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि आरोपीच्या हालचाली लक्षात घेता, आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ च्या सुमारास मीरा रोड पूर्व येथील नया नगर भागात एका निर्माणाधीन इमारतीवर राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोन सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी जुबैर अंसारी (३१) तिथे आला. त्याने दोन्ही रक्षकांना त्यांची नावे आणि धर्म विचारला. त्यानंतर त्याने त्यांना कलमा वाचता येतो का? अशी विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी नकार देताच, अंसारीने खिशातील चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले.

या हल्ल्यात राजकुमार मिश्रा यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुब्रतो सेन यांनी सुरक्षा केबिनमध्ये लपून आपला जीव वाचवला आणि पोलिसांना माहिती दिली.

'लोन वुल्फ' अटॅकचा संशय; तपासात धक्कादायक खुलासे

नया नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या दीड तासात जुबैर अंसारीला त्याच्या भाड्याच्या घरातून अटक केली. मात्र, तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपीकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत 'LONE WOLVES WILL POUNCE ON YOU' आणि हिंदुस्थानातील खऱ्या जिहादची भाषा वापरण्यात आली आहे. तसेच यात गाझा आणि जिहाद या शब्दांचाही उल्लेख आहे. तपासानुसार, अंसारी सातत्याने इंटरनेटवर आयएसआयएसशी संबंधित कट्टरपंथी व्हिडिओ पाहत असे. आरोपी उच्चशिक्षित असून त्याने २०१९ पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. तो एका कोचिंग सेंटरमध्ये गणित आणि रसायनशास्त्र शिकवत असे.

एटीएसकडून डिजिटल पुराव्यांची तपासणी

हा हल्ला पूर्व नियोजित होता की रागाच्या भरात केला गेला, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीचा मोबाईल, ब्राउझिंग हिस्ट्री आणि तो कोणाच्या संपर्कात होता का, याची कसून चौकशी केली जात आहे. एकट्यानेच कट रचून हल्ला करण्याच्या पद्धतीला लोन वुल्फ अटॅकशी हा प्रकार मिळताजुळता असल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पोलिसांचे आवाहन

या घटनेनंतर परिसरात अफवा पसरू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी माहिती किंवा मेसेज सोशल मीडियावर पसरवल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Road: Man stabs guards after asking about 'Kalma'.

Web Summary : In Mira Road, a man stabbed two security guards after questioning their religion and asking if they knew the 'Kalma'. The attacker, Zubair Ansari, has been arrested. Investigation reveals possible 'lone wolf' attack motive with ISIS links. ATS is investigating the case.
टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस