शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:15 IST

Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही सनसनाटी माहिती समोर आणली आहे.

महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही सनसनाटी माहिती समोर आणली आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने अजित पवार यांच्या घराबाहेर आणि शेतात पूजा केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

या संदर्भात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात खरातचा जो अँगल आहे तो सीआयडीने हाती घेतला नव्हता, तो हाती घ्यावा अशी मागणी करण्यासाठी मी येथे आलो आहे. अजितदादांच्या काटेवाडीत असलेल्या घराजवळील शेतात एक विहीर आहे. या विहिरीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या झाडाला २८ तारखेपूर्वी एक बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली होती. आता तिथे फक्त बकरीची हाडं आणि काही मांस शिल्लक आहे.

बारामतीमधील एक छोटा नेता होता खरातच्या संपर्कातरोहित पवार यांनी पुढे सांगितले की,  आम्हाला जी माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार बारामतीमधील एक छोटा नेता आहे. तो खरातच्या सातत्याने संपर्कात होता. तसेच अजितदादांच्या पक्षातील जे नेते खरातच्या संपर्कात होते. त्या लोकांसोबत या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यामध्ये या नेत्याचा सहभाग आहे, असे आम्हाला कळले आहे. तसेच अजितदादांच्या काटेवाडीमधील घराची आणि सहयोग येथे असलेल्या घराची पूजा ही या छोट्या नेत्याच्या माध्यमातून करण्यात आली, असं आम्हाला कळलं आहे.

दरम्यान, आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही. आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. मात्र या मागचा हेतू काय होता. तसेच दादांच्या काटेवाडी येथील घर, सहयोगमधील घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घरांबाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या. मग खरातच्या खात्यामध्ये २७, २८ आणि २९ जानेवारी रोजी उलाढाल का वाढली, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला.

पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल, खरातनं केलं होतं भाकिततसेच एक शेतकरी अशोक खरात याला २६ की २७ जानेवारी रोजी भेटला होता. तसेच पवार कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी त्याने पवार कुटुंबातील सारं काही नीट होईल का, असे त्याने अशोक खरातला विचारले. तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल, किंवा अडचण निर्माण होईल, असे अशोक खरातने त्या शेतकऱ्याला सांगितल्याचं आम्हाला कळलं आहे. आता या सर्वामध्येही सीआयडीन चौकशी करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Rohit Rautरोहित राऊतAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस