Sanjay Nirupam on Uddhav Thackeray, Maharashtra MLC Elections: महाराष्ट्रात सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुकीचे वातावरण असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यात महाविकास आघाडीकडून केवळ एकच उमेदवार उभा करता येणार होता. अशावेळी सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महायुतीनेही शरद पवारांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्यात हातभार लावला. आता आगामी काळात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जावी आणि तेदेखील बिनविरोध निवडून येण्यासाठी महायुतीने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण शिंदेसेनेचे संजय निरूपम यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे.
शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्यात मोठा फरक!
"शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा फरक आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. ते राज्यसभेसाठी निवडणूक लढवत असतील तर ती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी भावना होती. पण उद्धव ठाकरे इतके मोठे नाहीत की त्यांना निवडून आणण्यासाठी फक्त नऊ जागांवरच निवडणुका झाल्या पाहिजे," अशा शब्दांत संजय निरुपम यांनी रोखठोक भूमिका मांडली. "जर दोन व्यतिरिक्त अजून एक उमेदवार आम्ही निवडून आणू शकू असे वाटत असेल तर समोर कोणता उमेदवार उभा आहे याचा आम्हाला फरक पडत नाही," असेही ते म्हणाले.
जास्तीचा उमेदवार देण्याबाबत...
शिंदेसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी कोणाला मिळेल यावरही त्यांनी भाष्य केले. "एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची किंवा द्यायची नाही ते सर्व एकनाथ शिंदे पाहतात. यावर जो निर्णय होईल ते एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर घेतला जाईल. दहावा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. आमच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार दोन विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू शकतो. गरज पडली तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमच्या संपर्कात असतात. त्यांची सर्वांची इच्छा असली तर अजून एक उमेदवार देण्यासंदर्भात विचार होईल," असे सूचक विधान निरुपम यांनी केले.
Web Summary : Sanjay Nirupam stated Uddhav Thackeray isn't as senior as Sharad Pawar to warrant unanimous support in the upcoming MLC elections. While Pawar deserved unopposed Rajya Sabha entry, Thackeray doesn't. Shinde's party may field a third candidate if support permits.
Web Summary : संजय निरुपम ने कहा कि उद्धव ठाकरे शरद पवार जितने वरिष्ठ नहीं हैं कि आगामी एमएलसी चुनावों में उन्हें सर्वसम्मति से समर्थन मिले। पवार निर्विरोध राज्यसभा के हकदार थे, ठाकरे नहीं। शिंदे की पार्टी समर्थन मिलने पर तीसरा उम्मीदवार उतार सकती है।