शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:36 IST

शिवाजी कोण होता या पुस्तकारवरुन सुरु असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका पुस्तकावरून बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वादावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. या पुस्तकातील काही मजकुरावर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र आक्षेप घेत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला. गायकवाड यांनी नंतर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हा वाद इथेच न थांबता आता रस्त्यावरच्या लढाईत रूपांतरित झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्या प्रकाशकाला धमकी देण्यात आली, ते प्रशांत आंबी स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहेत. आंदोलकांनी एक पाऊल पुढे टाकत थेट संजय गायकवाड यांच्या निवासासमोर या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्याचे आव्हान दिले. आंदोलकांच्या या आव्हानाला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "आम्ही शांतपणे पुस्तक ऐकणार आहोत. वाचनादरम्यान जर एकेरी भाषेत उल्लेख करून शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तर त्याची सर्व जबाबदारी आयोजक आणि वाचणाऱ्यांची असेल," असं संजय गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

 या वाढत्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी खरोखर ते पुस्तक वाचले आहे का, हा प्रश्न आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

"खरंतर हा निरर्थक वाद निर्माण झाला आहे. हे लक्षात ठेवा की या देशात छत्रपती शिवरायांचा कुणीही अपमान करु शकत नाही. छत्रपतींचा मान इतका मोठा आहे की कुणीही त्यांचा अपमान करणे हे शक्यच नाही. हे पुस्तक १९७९ रोजी लिहिलं आहे. त्याच्यावर आज वाद उकरुन काढायचा आणि दोन्ही बाजूंनी भिडायचे. हे असंवेदनशील कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने हे पुस्तक वाचलं की नाही हे माहिती नाही. आंदोलन करणाऱ्यांना कशासाठी आंदोलन करतोय हे त्यांना माहिती नाही असं मला वाटतं. केवळ कुठलातरी मुद्दा पकडायचा आणि त्यावर वाद निर्माण करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis questions if objectors read the book; urges against needless dispute.

Web Summary : CM Fadnavis criticized the controversy surrounding the book 'Shivaji Kon Hota?', questioning if objectors had even read it. He deemed the dispute pointless, emphasizing that no one can insult Shivaji Maharaj, and urged against creating conflict for publicity.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Gaikwadसंजय गायकवाड