By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:11 IST
1 / 15आपल्या आजूबाजूला एक ऊर्जा काम करत असते. अनेक गोष्टी त्या ऊर्जेमुळे होत असतात, घडत असतात, असे मानले जाते. तसेच नक्षत्र, राशी, त्यांचे स्वामी ग्रह यांचीही एक गुप्त ऊर्जा काम करत असते. अनेकदा ती ऊर्जा कमकुवत होऊ शकते. त्या ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ शकतो. राशींची ऊर्जा जागृत करण्यासाठी काही सुलभ उपाय सांगितले जातात.2 / 15प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला एक ऊर्जा कार्यरत असते. ही ऊर्जा वाढावी किंवा स्थिर राहावी, यासाठी काही उपाय सांगितले जातात. प्रत्येक राशीची एक गुप्त ऊर्जा असते, असे मानले जाते. त्या-त्या राशीनुसार काही उपाय केल्यास ही ऊर्जा जागृत होण्यास मदत मिळू शकते. 3 / 15काही साधे, सोपे, सुलभ उपाय केल्यास ही ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू शकते. त्याचा चांगला लाभ होऊ शकतो. नशीब आणि भाग्याची भक्कम साथ लाभू शकते, कामे सुरळीत पार पडू शकतात. धन्य-धान्य वृद्धी होऊ शकते, असे सांगितले जाते. 4 / 15मेष: रोज तांब्याच्या वस्तूंचा वापर करावा.5 / 15वृषभ: हात आणि पाय जास्तीत जास्त जमिनीशी संलग्न ठेवा.6 / 15मिथुन: घरातील वातावरणात कायम सुगंध ठेवा.7 / 15कर्क: पांढरी फुले स्वतःच्या हाताने देवाला वाहावीत.8 / 15सिंह: सकाळच्या सूर्य प्रकाशात जास्त वावर ठेवा.9 / 15कन्या: घरात आणि आजूबाजूला जेवढी स्वच्छता ठेवता येईल, तेवढी ठेवा.10 / 15तूळ: गुलाबी रंग असलेली वस्त्रे जवळ ठेवा.11 / 15वृश्चिक: पाणी नियमित जास्त प्यावे अन् पाण्याचे दान करावे.12 / 15धनु: दत्त मंदिरात जाऊन गुरुचे पूजन करावे.13 / 15मकर: शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा. काळ्या वस्तूंचे दान करा.14 / 15कुंभ: नारळ, तेलाचे दान करावे.15 / 15मीन: नित्य नियमाने आवडत्या किंवा आराध्य देवतेचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.