Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:03 IST

Gold Silver Rate Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. २८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६२९ रुपयांनी स्वस्त झाला असून, तो आता १,४९,५५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलाय. तसंच चांदी ५,३८१ रुपयांनी स्वस्त होऊन २,३८,३३९ रुपये प्रति किलोवर पोहोचली.

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

आयबीजेए (IBJA) नुसार, आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४९२ रुपयांनी कमी होऊन १,३६,९९४ रुपयांवर आलाय. या किमतीत ३ टक्के जीएसटी समाविष्ट नाही; जीएसटीसह हा दर १,४१,१०३ रुपये इतका असेल. तसंच १८ कॅरेट सोन्याचा दरही आज १,२२२ रुपयांनी घसरून जीएसटीशिवाय १,१२,१६८ रुपये झालाय. जीएसटीसह याचा भाव १,१५,५३३ रुपये इतका होईल.

Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर

सराफा बाजारात आज २३ कॅरेट सोन्याची किंमत १,६२३ रुपयांनी घसरून १,४८,९५८ रुपयांवर पोहोचली आहे. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत ९५३ रुपयांनी कमी होऊन ८७,४९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते.

'ऑल टाइम हाय' पासून दर किती कमी?

आयबीजेए दरानुसार, सोनं आता सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या 'ऑल टाइम हाय'पेक्षा २६,५६४ रुपयांनी स्वस्त झालेत. तर चांदीच्या दरात सर्वोच्च पातळीपासून १,४४,७५,९४ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास, आतापर्यंत सोनं ९,५४० रुपयांनी आणि चांदी २९,५६१ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, silver prices plummet! Big drop in rates; Check latest prices.

Web Summary : Good news for wedding season! Gold prices decreased by ₹1,629 to ₹1,49,557 per 10 grams. Silver fell sharply by ₹5,381 to ₹2,38,339 per kg. Gold is now ₹26,564 cheaper than its all-time high.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक