Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:43 IST

२५ एप्रिलला रात्री पोलिस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवर दोन ट्विटर खात्यांद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

मुंबई - गोरेगाव परिसरात रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावत वाढदिवसाचे रील तयार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे एकाला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी कार डीलर फहद खलील समशुद्दीन शेख (वय ३३, रा. सोमानी ग्रामपंचायत, राम मंदिर) याला अटक केल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.

गोरेगाव पोलिस ठाण्याचे शिपाई वैभव इनकर यांच्या तक्रारीनुसार, २५ एप्रिलला रात्री पोलिस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवर दोन ट्विटर खात्यांद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये सोमानी ग्राम, राम मंदिर रोड, गोरेगाव पश्चिम येथे फहद शेख याने रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावत स्वतःच्या वाढदिवसाचे रील तयार केल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस शिपाई वैभव इनकर, निरीक्षक अब्दुल रऊफ शेख, गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरचौकशीत शेखने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. सार्वजनिक रस्त्यावर ज्वलनशील पेट्रोल टाकून त्यास आग लावल्याने मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच इतरांच्या सुरक्षिततेला बाधा येऊ शकते, असा पोलिसांचा आरोप आहे. या कृत्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Reel for birthday lands youth in jail for dangerous stunt.

Web Summary : Mumbai car dealer Fahad Sheikh arrested for setting fire to petrol on a public road to create a birthday reel. Police cited endangerment to public safety.
टॅग्स :गुन्हेगारी