भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे. यानुसार, आधार कार्डचा वापर आता जन्मतारखेचा निश्चित पुरावा म्हणून करता येणार नाही. आधार हे फक्त तुमच्या ओळखीचा आणि निवासाचा पुरावा असून, ते वय पडताळणीसाठी अधिकृत दस्तऐवज मानले जाणार नाही.
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
बँकिंग, शाळा प्रवेश किंवा सरकारी योजनांसाठी नागरिक सर्रास आधारचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करत होते. मात्र, आधार नोंदणी करताना अनेकदा जन्मतारीख अंदाजे किंवा कोणत्याही ठोस कागदपत्राशिवाय नोंदवली जाते. त्यामुळे ही तारीख सरकारी नोंदींनुसार पूर्णपणे अचूक नसते. याच तांत्रिक त्रुटीमुळे न्यायालये आणि विविध सरकारी विभागांनी आधारला वयाचा अंतिम पुरावा मानण्यास नकार दिला आहे.
आता जन्मतारखेसाठी 'हे' पुरावे चालणार
आधार कार्डाऐवजी आता तुम्हाला खालीलपैकी एक कागदपत्र सादर करणे अनिवार्य असेल:
जन्म प्रमाणपत्र : सर्वात प्राथमिक आणि विश्वसनीय पुरावा.
दहावीची गुणपत्रिका : बोर्डाचे अधिकृत प्रमाणपत्र.
पासपोर्ट : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेला पुरावा.
शालेय प्रमाणपत्र : शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला.
सरकारी अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र: अधिकृत जन्मतारीख प्रमाणपत्र.UIDAI च्या नियमांनुसार, या कागदपत्रांच्या आधारे आधारमधील जन्मतारीख सत्यापित मानली जाते. हा नियम नवीन नाही, पण आता तो स्पष्ट करण्यात आला आहे. पूर्वी लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी आधारचा वापर करत होते, पण आता तुम्हाला थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
Web Summary : UIDAI clarifies Aadhar is not definitive proof of age. Use birth certificates, 10th-grade mark sheets, passports, school certificates, or government-issued documents for age verification. Aadhar serves only as identity and residence proof.
Web Summary : UIDAI ने स्पष्ट किया है कि आधार उम्र का निश्चित प्रमाण नहीं है। आयु सत्यापन के लिए जन्म प्रमाण पत्र, 10वीं कक्षा की मार्कशीट, पासपोर्ट, स्कूल प्रमाण पत्र या सरकार द्वारा जारी दस्तावेजों का उपयोग करें। आधार केवल पहचान और निवास प्रमाण के रूप में कार्य करता है।