मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. निमलष्करी दलाच्या ६०० जवानांसह सुमारे ९ हजार पोलीस मतदानाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...