Four crores rupees cash seized by the Election Commission in Worli | वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड 
वरळीत निवडणूक आयोगाने जप्त केली चार कोटींची रोकड 

मुंबई - वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्बल चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी आटोपल्यानंतर संध्याकाळच्यावेळी झालेल्या तपासणीच्या वेळी ही रक्कम जप्त करण्यात आली. 

दरम्यान, ही रक्कम कुठून आणली जात होती आणि कुणाची होती याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेले आहे. 


Web Title: Four crores rupees cash seized by the Election Commission in Worli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.