बीड - परळी हायवेवर कुप्पानजीक वळणावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास लग्नासाठी दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून एकजण जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले ...
बीड बसस्थानकात मुलीची छेड काढली, तिला कत्तीची भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने धावत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. नशेत असलेला अट्टल गुन्हेगार एरार (अब्दुल रहेमान) यानेही तिचा पाठलाग केला. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने थांबविण्याच ...
दारू लपवून ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरेश अर्जुन निकम याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना चार वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे घडली होती. याप्रकरणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी ...
जुन्या माजलगाव भागातील अनिल लिंबगावकर यांच्या घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून दागिने व रोख रक्कम असा तीन लाख रूपयांचा तर याच भागातील अनिल पुरबूज यांच्या घरातून आठ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटना बुधवारी मध्यरात्री घडल्या. ...
बीड जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील १५९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. ही घटना शेकडो प्रवाशांसमोर बीड बसस्थानकात गुरूवारी सकाळी घडली. ...
ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत म ...
दिल्ली येथील एका कन्सल्टन्सीच्या नावाने अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील बेरोजगार युवकास बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. वेगवेगळ्या शुल्कापोटी त्याच्याकडून ४३ हजार २४६ रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...