Next

समीर वानखेडेंची बहीण लेडी डॉन आरोपांवर म्हणते की.... | Jasmin Wankhede | Fletcher Patel | Lady Don

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:59 AM2021-10-18T10:59:43+5:302021-10-18T11:00:25+5:30

फ्लेचर पटेल..(flecther patel) लेडी डॉन (lady don) कोण आहे आणि समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) काय संबंध ...मंत्री नवाब मलिकांकडून NCB विरोधात आज गौप्यस्फोट करताच राजकिय वर्तुळात खळबळ माजली. फ्लेचर, लेडी डॉन, NCB च्या अधिकाऱ्याबरोबर काय संबंध आहेत असा सवाल मलिकांनी केलाय. त्यांचा रोख NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे करण्यात आलाय. फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्यासोबत NCB अधिकारीं समीर वानखेडेंचे विविध फोटो व्हायरल होत असल्यामुळे NCB वर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर मलिकांनी उल्लेख केलेल्या 'लेडी डॉन'चे मनसे नेत्यांसह इतर काही दिग्गज मंडळींसोबत देखील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे...