Next

प्रेतावर भाकरी भाजून खाणारी बनली हजारोंची माय "Mother Of Orphans," Sindhutai Sapkal Dies At Age 73

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:41 PM2022-01-05T17:41:09+5:302022-01-05T17:41:28+5:30

सिंधुताई सपकाळ... हाफ टाईम शिकलेली तेही चौथी वरपास... हजारोंची माय २८२ जावई, ४९ सुना आणि ३५० मुलाची आई... इतकं मोठं कुटुंब... कोणत्या ना कोणत्या कारणाने डोक्यावरचं आधाराचं छत्र हरपल्याने हजारो अनाथ झालेल्यांचं आभाळ... हे सगळे एकाच झाडाच्या सावलीत फुलले, बहरले आणि त्यांचा आयुष्याचा आणि प्रगतीचा वेलू गगनावरीही गेला... ते झाड म्हणजे सिंधुताई... खराखुरा आधारवड... पण आता हा आधारवड हरपलाय...