Next

पत्रकाराचा 'तो' प्रश्न अन् अजितदादांचा पारा चढला, पाहा काय घडलं? Ajit Pawar | Jitendra Awhad | OBC

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:38 PM2022-01-05T17:38:59+5:302022-01-05T17:39:21+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहेत.. पत्रकार परिषदेत, जाहीर कार्यक्रमात बोलत असताना कोणाचीही भीडभाड न ठेवता ते आपली मते व्यक्त करत असतात.. पत्रकारांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय असं सहसा होत नाही.. परंतु पुण्यात आज वेगळंच घडलय.. पत्रकारांशी बोलण्यासाठी पुढे आलेल्या अजितदादांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर दादांच्या रागाचा पारा चढला... नेमकं झालं काय होतं पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून...