Next

Kirit Somaiya Shivsena नेत्यांमध्ये भांडण लावतायत? Pratap Sarnaik, Anil Parab, Milind Narvekar

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:27 PM2022-01-14T14:27:22+5:302022-01-14T14:27:37+5:30

किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतायत का अशी चर्चा सुरु आहे. हा म्हणजे चर्चेला कारण रामदास कदम यांचं कथित ऑडिओ क्लिप प्रकरण नाही. ज्यात रामदास कदम यांनी अनिल परबांविरोधात सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप होता. तर आता प्रकरण शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री अनिल परब आणि उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासंबंधी आहे. प्रताप सरनाईकांवर ठाकरे सरकारनं एक मेहेरबानी केलीय पण त्याचवेळी तोच न्याय अनिल परब, मिलिंद नार्वेकरांना लावलेला नाही. त्यामुळेच मिलिंद नार्वेकरांपेक्षा सरनाईक खास झाले का, सरनाईकांना सूट मग मिलिंद नार्वेकरांवर अन्याय का असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारलाय. सरनाईकांवर ठाकरे सरकारनं अशी काय मेहेरबानी केलीय, अशी सूट मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याला का दिली नाही, सोमय्या सेना नेत्यांमध्येच कसं भांडण लावतायत यावरच बोलुयात पुढच्या ३ मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात सरनाईकांना ठाकरे सरकारनं नेमकी काय सूट दिलीय.