Next

संजय राऊत यांनी काँग्रेसला का सुनावलं? Sanjay Raut On Congress | Goa Election 2022 |

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:28 PM2022-01-14T14:28:32+5:302022-01-14T14:28:47+5:30

Goa Election 2022 : Sanjay Raut On Congress कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय वातावरण तापतं... आणि आघाडी, युती यांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहायला लागते. कोण कुणासोबत हातमिळवणी करणार, कोण कुणाला एकटं पाडणार अशा अनेक चर्चा झडू लागतात. आताही पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर अशा राजकीय अटकळी बांधत, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातायत. इतर चार राज्यांप्रमाणेच गोव्यातही भाजपविरोधी गट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी शिवसेना नेते संजय राऊत प्रयत्नशील असताना पाहायला मिळत आहेत. मात्र, संजय राऊत यांच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेससोबत गोव्यात महाविकास आघाडी करण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न जोरात सुरू असतानाच, आणि संजय राऊतांकडून तशी वक्तव्य केली जात असतानाच, काँग्रेसने अचानक उमेदवार यादी जाहीर केली. आणि संजय राऊतांच्या आघाडीच्या मनसुब्यांना थेट सुरूंगच लावला. काँग्रेसने गोव्यात केलेली ही कृती राऊतांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. आणि त्यांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात संजय राऊत काय म्हणालेत..