Next

राज्यपाल कोश्यारी नव्या १२व्या भिडूला एण्ट्री देणार? Bhagat Singh Koshyari | Rajani Patil

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 09:42 AM2021-09-28T09:42:30+5:302021-09-28T09:42:52+5:30

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही... ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपालांकडे ही यादी मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आली होती... याला आता दहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलाय.. पण तरीही राज्यपालांनी ही यादी मंजूर केलेली नाही... किंवा यावर आक्षेप घेत फेटाळलेली ही नाही... दरम्यान आता काँग्रेसने तर या यादीतील रजनी पाटील यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलंय... राजीव सातव यांच्या निधनानंतर लागलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध झालेय.. भाजपने आपला अर्ज मागे घेतलाय.. आणि त्यामुळे काँग्रेसच्या रजनी पाटील या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या कोट्यातून आमदार होताहोता खासदार झाल्यात...