Next

Majhi Tujhi Reshimgath Pari - Myra Vaikul Look Radha | मायरा बनली राधा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:34 AM2021-09-01T11:34:14+5:302021-09-01T11:34:35+5:30

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गोकुळाष्टमी हा सण मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गोकुळाष्मीच्या दुस-या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा उत्साह ही पाहायला मिळतो. सध्या लॉकडाऊनमुळे हा सण एकत्र येऊन साजरा करणं शक्य नसल्याने घराच्या घरी सर्वजण या सणाचा आनंद घेतायेत. दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाईचा उत्साह देखील पाहायला मिळतो. इतकच नव्हे गोकुळाष्टमीसाठी छोट्या बाळगोपाळांचा देखील उत्साह पाहण्याजोगा असतो. नुकतीच ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायर वायकुळ ही गोकुळाष्टमीनिमित्त खूपच उत्साही दिसून आली.