दौंड पोलिसांनी मोका लावलेला दरोड्यातील आरोपी १६ जुलै रोजी पहाटे येरवडा जेलमधून पळाला होता. त्यास श्रीगोंदा व पुणे पोलिसांनी सिनेस्टाईलने चार किलोमीटर पाठलाग करुन पकडले. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे घडली. ...
यंदा हंगामाच्या सुरुवातीला धो धो पाऊस बरसल्याने श्रीगोंदा-नगर-कर्जत तालुक्यांच्या हद्दीवरील साकळाई, कोंगजाई डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. येथील ओढे-नाले वाहू लागले असून धबधबे कोसळू लागले आहेत. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू ...
मोटारसायकलवर रस्ता ओलांडत असताना कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (१८ जुलै) रात्री झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (१९ जुलै) एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. ...
मुंबईतील बारमधील ललनाच्या प्रेमात पडलेल्या फौजदाराच्या पत्नीने रोजच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१४ जुलै) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी येथे घडली. ...
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात राजकारण पेटले आहे. उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरोधात १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. नवीन सभापती, उपसभापती निवडीवर छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...