Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील श्री राम मंदिर लवकरच आकारास येऊ लागणार आहे. प्लिंथचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गर्भगृहाचे बांधकाम झाल्यानंतर फरशीचे काम सुरू होईल. त्यासाठी कोरीव दगडांची खेप राजस्थानातून येण्यास सुरुवात झाली आहे. ...
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून यावर कमळाचे चिन्ह दिसून येते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचा फोटो छापण्यात आला आहे ...
Vishwa Hindu Parishad Surendra Jain : राम मंदिरासाठीच्या चळवळीमुळे आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं. ही स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही मोठी चळवळ होती, असं सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे. ...