जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
कुणी मुद्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, असा सल्लाही भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना शरद पवार यांनी दिला. ...
पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. ...