इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 10:39 PM2019-08-06T22:39:12+5:302019-08-06T22:39:49+5:30

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला.

Imran Khan's controversial statement; Threatened to attack like Pulwama | इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी

इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी

googlenewsNext

इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द झाल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सहन झालेले नाही. केंद्र सरकारने या राज्याचा विशेष दर्जा रद्द करत विभाजनही केले आहे. यामुळे धक्का बसलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विशेष सत्र बोलावले होते. यावेळी इम्रान खान यांनी चुकीच्या शब्दांचा प्रयोग केला आहे. 


पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. तसेच हा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या वेळी त्यांची जीभ घसरली. भारताच्या या पावलामुळे काश्मीरमधील हालत आणखी गंभीर होईल. त्यांनी यापुढे जात भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. 


पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यामागे काही संबंध नसल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, याचा उल्लेख करताना इम्रान खान यांनी मोदींचा हा निर्णय काश्मीरच्या लोकांना चिरडून टाकण्यास सक्षम नसल्याचेही म्हटले आहे. भाजपा त्यांच्या संस्थापकांच्या जातीयवादी विचारधारेवर काम करत आहे. ज्यांनी मुस्लिमांना दुय्यम नागरिक मानले आहे. जिनांना माहिती होते की आरएसएसला भारतात केवळ हिंदू हवे आहेत. मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळेल, असे इम्रान खान म्हणाला. 


एका वृत्तानुसार पाकिस्तान भारतातील उच्चायुक्तांना मागे बोलविण्याचा विचार करत आहे. 
 

Web Title: Imran Khan's controversial statement; Threatened to attack like Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.