भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
रोजगार निर्मिती आणि कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रतील गुंतवणुकीवर भर देणारा गोव्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. ...
राज्यात एकूण 1 हजार 800 पोलिसांची संख्या कमी आहे. येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. ...
मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार लवकरच मच्छिमारी महामंडळ स्थापन करणार असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून बुधवारी भाजपात आलेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज गुरुवारी दुपार पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...