Four ministers, including Vijay Sardesai, dropped from cabinet, the Chief Minister's Pramod sawant says from Delhi | विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा 
विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा 

ठळक मुद्देमार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते.मुख्यमंत्री शुक्रवारीही दिल्लीत होते. काही मंत्री घाईघाईत काही फाईल्स निकालात काढत असल्याची कल्पना गोव्यातील काही भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत फोनवरून दिली होती.

पणजी : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला व आपण तो निर्णय या मंत्र्यांना कळवला असल्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिल्लीतूच जाहीर केले. एकंदरीत भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्डचा सहभाग दोन वर्षे व चार महिन्यांनंतर आता संपुष्टात आला आहे. नव्या चार मंत्र्यांचा आज शनिवारी शपथविधी होईल.

मार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते. र्पीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. तथापि, गोवा फॉरवर्डचे तीन आणि दोघा अपक्ष मंत्र्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. केंद्रात पुन्हा मोदी सरकार पूर्ण शक्तीने अधिकारावर आले. यानंतर गोवा सरकारमधील समीकरणो बदलण्यास आरंभ झाला. मुख्यमंत्री सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, संघटनमंत्री सतिश धोंड व एकूणच भाजपच्या कोअर टीमने गुरुवारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी दिल्लीत चर्चा केली. विजय सरदेसाई, रोहन खंवटे आदींसोबत काम करताना ब:याच अडचणी येतात असे मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना सांगितले. तत्पूर्वीच गोव्यात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असायला हवे असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोवा भाजपला सांगितले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री नुकतेच गोव्यात होते. त्यावेळीही त्यांनी भाजपच्या कोअर टीमकडे असेच बोलून दाखवले होते. काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपचे संख्याबळ 27 झाले. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे तिघे आणि अपक्ष खंवटे या चौघा मंत्र्यांना डच्चू द्यावा असा निर्णय झाला. हा निर्णय चौघाही मंत्र्यांना शुक्रवारी पाच वाजेर्पयत कळवावा, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री सावंत यांना सांगितले. 

मुख्यमंत्री शुक्रवारीही दिल्लीत होते. काही मंत्री घाईघाईत काही फाईल्स निकालात काढत असल्याची कल्पना गोव्यातील काही भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत फोनवरून दिली होती. काही पीडीएमधील अधिकारीही आऊटवर्ड घाईघाईत करत होते त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी घाई न करण्याची सूचना केली. चौघाही मंत्र्यांनी सचिवालयात येणो शुक्रवारीच बंद केले. त्यांनी त्यांच्या केबिनमधील आपली स्वत:ची कागदपत्रेही ताब्यात घेतली. दोघांनी केबिन स्वच्छ करून घेतले. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून लोकमतला सांगितले की, मी विजयसह चौघाही मंत्र्यांना फोन केला व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय त्यांना कळवला. चौघांनीही मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत असे मी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानंतर चौघाही मंत्र्यांना कळविले.
 

Web Title: Four ministers, including Vijay Sardesai, dropped from cabinet, the Chief Minister's Pramod sawant says from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.