गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ ...
जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठ ...
शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळा बांधकामासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी १३ शाळांमध्ये बांधकामे रखडली असून, ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणी संबंधित शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्ष, सचिवांकडून ही रक ...
जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़ ...
शहर व ग्रामीण भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर पोलिसांनी पाच ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून ५२ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली. ...
रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे. ...
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घे ...