३ एप्रिलपासून सुरूहोणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये विद्यापीठाकडून नवीन उत्तरपत्रिका महाविद्यालयांना पुरविण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना काढून टाकण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली आहे ...
विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आता आॅनलाइन साक्षांकित करून मिळतील. कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेचा मोठा फटका मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला बसणार आहे. विद्यापीठाला यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी अर्थसंकल्प मांडता येणार नसल्याचे कळते आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. ...